शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोमेंडी बु. ग्रामपंचायतीत आचारसंहितेचा भंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 15:40 IST

आचारसंहितेच्या काळात ग्रामपंचायतीमार्फत ग्रामस्थांना टी - पॉयचे वाटप केल्याप्रकरणी रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी तालुक्यातील पोमेंडी बु. ग्रामपंचायतीवर कारवाई केली आहे. या कारवाईत ५६ टी-पॉय जप्त करण्यात आले असून, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

ठळक मुद्देपोमेंडी बु. ग्रामपंचायतीत आचारसंहितेचा भंगकारवाईत ५६ टी-पॉय जप्त

रत्नागिरी : आचारसंहितेच्या काळात ग्रामपंचायतीमार्फत ग्रामस्थांना टी - पॉयचे वाटप केल्याप्रकरणी रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी तालुक्यातील पोमेंडी बु. ग्रामपंचायतीवर कारवाई केली आहे. या कारवाईत ५६ टी-पॉय जप्त करण्यात आले असून, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणुकीसाठी आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. या काळात कोणत्याच राजकीय पक्षांना शासकीय योजना राबवता येत नाहीत, वस्तूंचे वाटपही करता येत नाही किंवा निर्णय घेता येत नाहीत. जिल्ह्यात आचारसंहिता जारी असतानाच तालुक्यातील पोमेंडी बु. ग्रामपंचायतीमार्फत तेथीलच आरोग्य केंद्रात ग्रामस्थांना टी - पॉयचे वाटप करण्यात येत होते. हे वाटप सुरू असल्याची माहिती तहसीलदार शशिकांत जाधव यांना मिळताच त्यांच्या भरारी पथकाने छापा मारला.ग्रामपंचायतीच्या निधीतून हे टी - पॉय देण्यात येत असल्याची माहिती या कारवाईदरम्यान समोर आली. ग्रामस्थांना देण्यासाठी एकूण २०० टी - पॉय आणले होते. त्यातील काही टी - पॉयचे वाटप करण्यात आले, तर पथकाच्या हाती ५६ टी - पॉय लागले आहेत. हे सर्व टी - पॉय जप्त करण्यात आले आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतRatnagiriरत्नागिरी