शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मदतीचे साहित्य घेऊन पोलीस धावले पणदेरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:21 IST

मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरण फुटण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हा पाेलीस नियंत्रण विभागाला मिळताच पाेलीस विभाग ‘अलर्ट’ झाला आहे. पाेलीस ...

मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरण फुटण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हा पाेलीस नियंत्रण विभागाला मिळताच पाेलीस विभाग ‘अलर्ट’ झाला आहे. पाेलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग मदतीच्या आवश्यक साहित्यासह

आपल्या १०० पोलीस अंमलदारांना सोबत घेऊन तत्काळ घटनास्थळी पोहाेचले आणि

स्थानिकांना धीर दिला.

जिल्हा

पोलीस नियंत्रण कक्षाला पणदेरी धरण फुटण्याची शक्यता असल्याची

माहिती प्राप्त झाली. ही माहिती मिळताच जिल्हा पाेलीस अधीक्षक यांनी आपल्या पाेलीस अंमलदारांना सूचना केल्या. गळतीमुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून डाॅ. गर्ग यांनी सहकाऱ्यांसह पणदेरीला धाव घेतली. पोलीस मुख्यालय, रत्नागिरी येथून जादा कुमक म्हणून १०० पोलीस अंमलदार रवाना झाले. तसेच

आपत्कालीन साधन सामग्री, फायबर बोट, लाईफ जॅकेट, रिंग बोये, रोप, सर्च

लाईट, स्ट्रेचर, प्रथमोपचार पेटी इत्यादी साहित्य तत्काळ पोहाेचविण्यात

आले.

तसेच प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन नागरिकांना धरण फुटून कोणतीही जीवितहानी होऊ

नये म्हणून पी. ए. सिस्टीम व मेगाफोनव्दारे स्थलांतरीत होण्याबाबत आवाहन

करण्यात आले. स्थलांतरित होण्याकरिता निर्माण होणाऱ्या अडचणी समजून घेऊन

जास्तीत जास्त लोकांना स्थलांतरित होण्याबाबत सांगण्यात आले. बौध्दवाडी, रोहिदासवाडी, कोंडगाव इत्यादी वाडीतील लोकांना महसूल व पोलीस

प्रशासनाच्या मदतीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याकरिता मदत करण्यात आली.

घटनास्थळी पाेलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्यासह खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी

काशिद, मंडणगड व बाणकोट पोलीस स्थानकाच्या पाेलीस निरीक्षकांनी भेट देऊन नागरिकांना धीर दिला. यावेळी त्यांच्या अडीअडचणी व लागणारी साधन सामग्री याबाबत माहिती घेतली. जिल्हा पोलीस दल आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर असून, इतर शासकीय आस्थापनांशी

समन्वय ठेवून आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही पाेलीस अधीक्षक डाॅ. माेहितकुमार गर्ग यांनी रहिवाशांना दिली.

-------------------------------

मंडणगड तालुक्यातील पणदेरी येथील धरणाला गळती लागून धरण फुटण्याचा धाेका निर्माण हाेताच पाेलीस अधीक्षक डाॅ. माेहितकुमार गर्ग घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी धरण परिसराची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला.