शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कार्तिकी एकादशीनिमित्त गेलेल्या संगमेश्वरातील भाविकांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 13:19 IST

रत्नागिरी : कार्तिकी एकादशीनिमित्त यात्रेनिमित्त पंढरपूरला गेल्या भाविकांमध्ये संगमेश्वर तालुक्यातील ३० भाविकांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. ...

ठळक मुद्देकार्तिकी एकादशीनिमित्त गेलेल्या संगमेश्वरातील भाविकांना विषबाधापंढरपूर येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू,२ बालेक आणि १० महिलांचा सहभाग

रत्नागिरी : कार्तिकी एकादशीनिमित्त यात्रेनिमित्त पंढरपूरला गेल्या भाविकांमध्ये संगमेश्वर तालुक्यातील ३० भाविकांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. या सर्व भाविकांवर शनिवारी पहाटेपासून पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये २ बालके आणि १० महिलांचा सहभाग आहे.संगमेश्वर तालुक्यातील कर्जा कुंभारवाडी येथील सुमारे ६० ते ७० लोकांची एक दिंडी पंढरपूरच्या वारीसाठी गेली होती. ही सर्व मंडळीयेथील धुंडामहाराज मठ्ठा शेजारील इनामदार वाड्या वास्तव्याला होती. त्यांनी उपवासाची खिचडी आणि भगर देखील स्वत: करून खाल्ली होती. यातूनच त्यांना विषबाधा झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.एकादशी दिवशी उपवासाचे पदार्थ आणि त्यानंतर खिचडी भाविकांनी खाल्ली. त्यानंतर शुक्रवारी रात्रीपासून त्यांना उलट्या सुरू होऊ लागल्या. त्यामुळे शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमाराला भाविकांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्यांच्यावर प्रशासनाकडून उपचार देखील सुरू करण्यात आले आहेत. प्रशासनातर्फे या भाविकांजवळील अन्नाचे व पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या संपूर्ण घटनेतील रुग्णांची प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्यअधिकारी सुनील वाळुजकर यांनी पाहणी केली. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.या घटनेची माहिती मिळताच चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी तातडीने तेथील जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. तसेच त्यांच्या शिक्षण संस्थेतून शिकून गेलेल्या माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर हे माजी विद्यार्थी वारकऱ्यांच्या मदतीसाठी रूग्णालयात दाखल झाले आहेत.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाRatnagiriरत्नागिरीPandharpurपंढरपूर