शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

चोरद नदीवरील पुलाची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 17:41 IST

दोन्ही बाजूकडील रस्त्याचा भाग कोसळण्याच्या स्थितीत

आॅनलाईन लोकमतखेड (जि. रत्नागिरी), दि. २२ : खेड - आंबवली मार्गावरील भरणे - सुकिवलीदरम्यान बांधण्यात आलेल्या चोरद नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूस केलेल्या भरावाला संरक्षक भिंत न बांधल्याने या पुलाच्या दोन्ही बाजूकडील रस्त्याचा भाग कोसळण्याच्या स्थितीत आहे.बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची जातीनिशी पाहणी करून हे काम तातडीने करणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास याविरोधात उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी रमेश घोले यांनी दिला आहे़ सुकिवली येथील चोरद नदीवर बांधण्यात आलेला हा पूल गेली ६० वर्षे आपले अस्तित्व टिकवून होता. या पुलाची डागडुजी करण्याची आवश्यकता नव्हती. मात्र, या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात वारंवार पुराचे पाणी पुलावर येत असे.़ त्यामुळे साहजिकच खेड-आंबवली तसेच अठरागाव धवडे-बांदरी विभागातील जनतेचे यावेळी मोठे हाल होत असत. या सर्व बाबींचा विचार करता येथे नव्याने पुलाची उभारणी करण्याची जनतेची मागणी आहे.आघाडी सरकारच्या काळात या पुलाला निधी उपलब्ध झाला. गेली दोन वर्षे या पुलाचे काम सुरू होते. पुलाचे काम जून २०१७मध्ये पूर्ण झाले आणि वाहतूक सुरू झाली. याचवेळी पुलाच्या दोन्ही बाजूंनी मातीचा भराव करण्यात आला आहे. मात्र, हा भराव पावसाळ्यात वाहून जाणार हे निश्चित होते. या भरावासाठी येथे संरक्षक भिंतदेखील बांधण्यात आलेली नाही़ त्यामुळे ऐन पावसामध्ये मातीचा हा भराव खालील बाजूला सरकू लागला आहे. काही दिवसातच हा भराव संपूर्णपणे खचण्याची शक्यता आहे.़ यामुळे दोन्ही बाजूच्या रस्ता खचणार असून, पुलाच्या काही भागाला याचा धोका निर्माण होणार आहे.