शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : रत्नागिरीत शासनाच्या विविध योजनांचे पोस्टर तत्काळ हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 14:21 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. आचारसंहितेमुळे एस्. टी. बसवर लावण्यात आलेले शासकीय योजनांचे फलक (पोस्टर) काढून टाकण्यात आले आहेत. त्याऐवजी आता मतदार नोंदणी करणारी पोस्टर्स लावण्यात आली आहेत. त्यामुळे गाड्यांवरील योजनांचे पोस्टर्स गेले असून, जागृतीचे फलक झळकू लागले आहेत.

ठळक मुद्देयोजना गेल्या अन् आली जागृती!शासनाच्या विविध योजनांचे पोस्टर तत्काळ हटविले

अरुण आडिवरेकर रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. आचारसंहितेमुळे एस्. टी. बसवर लावण्यात आलेले शासकीय योजनांचे फलक (पोस्टर) काढून टाकण्यात आले आहेत. त्याऐवजी आता मतदार नोंदणी करणारी पोस्टर्स लावण्यात आली आहेत. त्यामुळे गाड्यांवरील योजनांचे पोस्टर्स गेले असून, जागृतीचे फलक झळकू लागले आहेत.निवडणुकीची तारीख जाहीर होताच आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या काळात शासनाच्या कोणत्याही कामांची माहिती प्रसिद्ध करता येत नाहीत. तसेच शासनाच्या योजनांची माहिती देणारे फलक, पोस्टर्स, बॅनर तत्काळ हटविण्यात येतात. शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी एस्. टी. बसवर जाहिरातींचे पोस्टर्स चिकटविण्यात आले होते.

केंद्रशासनाच्या योजनांसह राज्यातील योजनांचाही यामध्ये समावेश होता. निवडणुकीची आचारसंहिता जारी होताच शासनाच्या या योजनांचे पोस्टर्स हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार एस्. टी. महामंडळाने गाड्यांवर चिकटवलेले पोस्टर्स काढून टाकण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनेनुसार ही पोस्टर्स हटविण्यात आली आहेत. त्यामुळे आता योजनांची पोस्टर्स गाड्यांवर दिसून येत नाहीत.या पोस्टर्सऐवजी मतदार नोंदणी जागृतीची पोस्टर्स चिकटविण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याची संधी गमावू नका, असा संदेश या पोस्टर्सवरून देण्यात आला आहे. तसेच मतदार नोंदणीसाठी मतदारांना आवाहन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त मतदारांनी आपली नोंदणी करून मतदानाचा हक्क बजवावा, असा यामागचा उद्देश आहे.जनजागृतीच्या पोस्टर्सचे प्रमाण कमीमतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम राबविण्यात आले. मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी एस्. टी. बसवर जागृतीची पोस्टर्स लावण्यात आली आहेत. मात्र, शासकीय योजनांचे पोस्टर्सच्या प्रमाणात ही पोस्टर्स खूपच कमी असल्याचे दिसत आहे. मोजक्याच गाड्यांवर ही पोस्टर्स लावण्यात आली आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRatnagiriरत्नागिरी