शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणी मिळण्यासाठी नियोजन करा : सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 13:15 IST

मुंबई, दि. १२ : राजापूर तालुक्यात (जि.रत्नागिरी) असलेल्या टंचाईग्रस्त गावांना पांगरे बु. येथील धरणाचे पाणी पाईपलाईनद्वारे मिळावे यासाठी पाणीपुरवठयाचे नियोजन करावे. तसेच नाविन्यपूर्ण योजना आखाव्या, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.

मुंबई, दि. १२ : राजापूर तालुक्यात (जि.रत्नागिरी) असलेल्या टंचाईग्रस्त गावांना पांगरे बु. येथील धरणाचे पाणी पाईपलाईनद्वारे मिळावे यासाठी पाणीपुरवठयाचे नियोजन करावे. तसेच नाविन्यपूर्ण योजना आखाव्या, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.राजापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आमदार राजन साळवी यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री खोत यांना निवेदन दिले होते. त्यानुसार आज राज्यमंत्री खोत यांनी सर्व मंत्रालयीन व क्षेत्रीय अधिका-यांसोबत बैठक आयोजित केली होती.बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जलसंपदा विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.राज्यमंत्री खोत यांनी सांगितले की, राजापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रॅव्हीटी तंत्रज्ञानाचा वापर करावा. पंपीगने पाणी पुरवठा करण्याबाबत महाराष्ट्र जीवन प्रधिकरण, जिल्हा परिषद, जलसंपदा विभागाने संयुक्त सर्वेक्षण करावे. माहिनाभरात याबाबतचा आराखडा तयार करून सादर करावा, असे निर्देश खोत यांनी दिले.पांगरे बु. धरणातून आसपासच्या गावांना पाणीपुरवठा करण्याच्या योजनेसाठी टंचाई निधीतून निधी घेणे शक्य आहे, याबाबत १५ दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना खोत यांनी दिल्या.