शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कुंभारखाणीतील पुलाचा पिलर खचला, पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 12:47 IST

bridge Konkan Ratnagiri- देवरुख तालुक्यातील आरवली ते राजिवली येडगेवाडी या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ४४ वरील कुंभारखाणी बु. येथील अति जुन्या पुलाच्या मधल्या पायाचा काही भाग ढासळला आहे. त्यामुळे कोणतीही हानी झाली नसली तरी त्यामुळे पूल कमवकुवत झाला असून, त्यावरील वाहतूक लगेचच बंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकुंभारखाणीतील पुलाचा पिलर खचला, पूल धोकादायकसर्व पुलांचे स्ट्रक्टरल ऑडिट करण्याची मागणी

देवरुख : तालुक्यातील आरवली ते राजिवली येडगेवाडी या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ४४ वरील कुंभारखाणी बु. येथील अति जुन्या पुलाच्या मधल्या पायाचा काही भाग ढासळला आहे. त्यामुळे कोणतीही हानी झाली नसली तरी त्यामुळे पूल कमवकुवत झाला असून, त्यावरील वाहतूक लगेचच बंद करण्यात आली आहे.५० च्या दशकातील या पुलाच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. हे काम कडवई येथील ठेकेदारामार्फत केले जात आहे. मागील एक महिन्यापासून पुलाचे दुरुस्तीचे काम करण्यात येत होते. यादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी पाहणी करण्यात येत होती. मात्र, मंगळवारी (दि. २) सकाळी येडगेवाडी -चिपळूण व येडगेवाडी-माखजन या वस्तीच्या दोन बस या पुलावरून गेल्यानंतर पुलाच्या मधल्या पायाचा भाग ढासळल्याचे दिसून आले.सध्या या पुलावरची वाहतूक बंद करण्यात आली असून, तात्पुरता पर्यायी रस्ता तयार करून वाहतूक वळविण्यात आली आहे. सकाळी ही घटना निदर्शनास येताच कुंभारखाणीचे पोलीस पाटील यांनी तहसीलदार सुहास थोरात व संगमेश्वर पोलीस स्थानकाचे निरीक्षक उदयकुमार झावरे यांना ही माहिती दिली. तहसीलदार यांनी याबाबत माहिती घेण्यासाठी तातडीने तलाठी यांना घटनास्थळी रवाना केले. वाहतुकीचा खोळंबा होऊ नये म्हणून वाहतूक व्यवस्था पाहण्यासाठी संगमेश्वर पोलीस स्थानकाचे कडवई बीट अंमलदार राजेंद्र जाधव व स्वप्निल जाधव हेही घटनास्थळी दाखल झाले.पूल ढासळल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देवरुख उपविभागीय अभियंता पूजा इंगवले व शाखा अभियंता प्रमोद भारती यांनी ढासळलेल्या पुलाची पाहणी केली. या पुलाची दुरुस्तीऐवजी नव्या पुलाची मागणी स्थानिकांनी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे, सामाजिक कार्यकर्ते संतोष येडगे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे शाखा अभियंता विकास देसाई, अक्षय बोरसे, ईश्वर बामणे, दिलीप सुर्वे, राकेश सुर्वे, विनायक सुर्वे, सुनील सुर्वे, सिध्दांत येडगे आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.सर्व पूल तपासाआरवली ते राजिवली येडगेवाडी या मार्गावरील सर्व पुलांचे स्ट्रक्टरल ऑडिट करण्याची मागणीही केली. त्यानुसार उपविभागीय अभियंता इंगवले, प्रमोद भारती यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसमवेत कुंभारखाणी ते कुचांबे दरम्यानच्या पुलांची पाहणी केली. आवश्यक असलेल्या मोऱ्या पावसाळ्यापूर्वी बांधून देण्याची मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागRatnagiriरत्नागिरी