शिक्षकांचे काम प्रेरणादायी
रत्नागिरी : कोरोनाच्या कठीण काळातही शिक्षकांनी ज्ञानदानाचे केलेले काम अतिशय प्रामाणिक तर आहेच, शिवाय सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डाॅ. गजानन पाटील यांनी केले.
साहित्य वितरण
रत्नागिरी : तालुक्यातील फणसोप विद्यार्थी कल्याण निधी समितीतर्फे शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. फणसोप येथील केंद्रशाळा गावातील मुख्य व सर्वांत जुनी शाळा आहे. माजी विद्यार्थ्यांनी विद्यार्थी कल्याण निधी समिती तयार केली आहे.
भातशेतीवर करपा
रत्नागिरी : तालुक्यातील काही भागात भातशेतीवर करपासदृश रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या रोगामुळे भातशेती करपून नुकसान आले आहे. गेल्या आठवड्यात पडणारे ऊन त्यानंतर सुरू झालेला पाऊस, गेल्या दोन दिवसांत पावसाची उघडीप परंतु, ढगाळ हवामानामुळे निळे भुंगेरे, लष्करी अळींचा प्रादुर्भाव वाढला आहे.
पीस पोस्टर चित्रकला स्पर्धा
रत्नागिरी : लायन्स क्लब ऑफ न्यू रत्नागिरीच्या वतीने पीस पोस्टर (जागतिक शांततेविषयक चित्र) या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ११ ते १३ वयोगटासाठी ही स्पर्धा खुली ठेवण्यात आली आहे. दि. १५ नोव्हेंबर २१ रोजी १३ वर्षे पूर्ण होणाऱ्या मुलांना या स्पर्धेत भाग घेता येणार आहे.