रत्नागिरी : रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर नाणीज येथील निर्मलवाडी येथे आज सकाळी पेट्रोलचा टँकर उलटला. त्यातून पेट्रोल गळती सुरू झाल्याने घबराट आहे. आज सकाळी भारत पेट्रोलियम चा पेट्रोलने भरलेला हा टँकर उलटला. त्यातून पेट्रोल गळती होत आहे. त्यामुळे घटनास्थळी तात्काळ रत्नागिरी येथील मोटार वाहन निरीक्षक कोराणे दाखल झाले आहेत. टँकरच्या चालकाला श्रीक्षेत्र नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
Ratnagiri: नाणीज येथे पेट्रोलचा टँकर उलटला, पेट्रोलची गळती
By अरुण आडिवरेकर | Updated: October 11, 2023 13:24 IST