शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पासपोर्टसाठी माराव्या लागतात मुंबईत फेऱ्या

By admin | Updated: November 2, 2014 00:48 IST

खासगी कंपनीकडे सुपूर्द

रत्नागिरी : पासपोर्ट कार्यालय खासगी कंपनीकडे सुपूर्द करण्यात आल्याने रत्नागिरी जिल्हा मुख्यालयात असलेले पासपोर्ट कार्यालय मुंबईत हलविण्यात आले आहे. परिणामी जिल्हावासियांना पासपोर्ट काढण्यासाठी मुंबईत फेऱ्या माराव्या लागत आहे. त्याकरिता हजारो रुपये खर्च येत असून खासगी एजंटदेखील पासपोर्ट काढण्यासाठी पैसे उकळत असल्याचे निदर्शनास येत आहे.अनेकजण परदेशात शिक्षण व नोकरीसाठी जातात. याशिवाय नातेवाईकांकडे किंवा पर्यटनासाठी जाणारी मंडळी असल्याने पासपोर्ट काढण्यासाठी त्यांना मुंबईमध्ये जावे लागते. दरमहा हजारोंचे अर्ज पासपोर्टसाठी आहेत. परंतु जिल्ह्यात ही प्रक्रिया होत नाही. जिल्हावासियांना आॅनलाईन नोंदणी करावी लागते. मुंबईत एजन्सीच्या कार्यालयात कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ घेऊनच मुंबईवारी करावी लागत आहे. मुळ पासपोर्टसाठी दिड हजार रुपये खर्च येतो. परंतु जाण्यायेण्यासाठी दोन हजारापर्यंतचा खर्च सोसावा लागत आहे. शिवाय लागणारा अर्ज व त्याकरिता जोडली जाणारी संंबंधित कागदपत्रे याबाबत माहिती नसल्याने त्यासाठी एजंट किंवा दलालांचा आधार घ्यावा लागतो. अर्ज भरुन देण्यासाठी दलाल दोन हजार रुपये घेत आहेत. त्यामुळे पासपोर्ट काढण्याकरिता पाच हजारापेक्षा अधिक खर्च लोकांना येत आहे. संबंधित कागदपत्रांची छाननी होऊन कागदपत्रे मुंबईहून रत्नागिरी पोलीस मुख्यालयात पाठविली जातात. त्यानंतर संंबंधित व्यक्तीची चारित्र्य पडताळणी पोलीस ठाण्यामध्ये होते. संबंधित पोलीस ठाण्यातील निरीक्षकांचे हमीपत्र मुंबईला पाठविले जाते. त्यानंतर टपालाने पासपोर्ट घरी पाठविला जातो. एकूणच किचकट स्वरुपाची प्रक्रिया असलेल्या पासपोर्टचे कार्यालय रत्नागिरी जिल्ह्यातच सुरु करावे अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)