शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

संगणकामुळे कळली प्रवासी संख्या

By admin | Updated: August 9, 2016 23:50 IST

प्रकाश रसाळ : अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून संवेदनशील प्रतिसाद

मुंबई - गोवा महामार्गावरील पोलादपूर- महाड दरम्यानचा सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल तुटला. या दुर्घटनेत जयगड - मुंबई व राजापूर - बोरिवली या दोन्ही गाड्यांना जलसमाधी मिळाली. दोन्ही गाड्यांतील २७ प्रवासी व चालक वाहक मिळून ३१ जण बेपत्ता झाले. गाडीत एकूण किती प्रवासी होते, याची माहिती जीपीएस यंत्रामुळे मिळू शकली, असे सांगतानाच प्रभारी वाहतूक नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी या यंत्रणेबाबतची माहिती ‘लोकमत’ला दिली.प्रश्न : सावित्री नदीवरील पूल तुटल्यामुळे झालेल्या दुर्घटनेतील प्रवासी संख्या कशी मिळाली ? उत्तर : मुंबई - गोवा महामार्गावरील पोलादपूर - महाड दरम्यानचा पूल तुटला. या दुर्घटनेत जयगड - मुंबई व राजापूर - बोरिवली या एस. टी. बसेस बेपत्ता झाल्यामुळे सुरूवातीला चालक वाहकांसह २२ प्रवासी असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. राजापूर - बोरिवली व जयगड - मुंबई गाड्यांच्या चालक - वाहकांची ड्युटी चिपळुणात संपल्यानंतर दुर्घटनेत सापडलेल्या चालक - वाहकांनी बसचा ताबा घेतला होता. ड्युटी संपल्यामुळे पूर्वीच्या चालकांनी हिशेब चिपळूण आगारात सादर केला होता. ईटीएम मशीनमुळे चिपळूणपर्यंतची सर्व माहिती चिपळूण आगारात प्राप्त झाली होती. मात्र, चिपळूणपासून राजापूर - बोरिवली गाडीचे वाहक टी. बी. शिर्के, चालक जी. एस. मुंडे यांनी, तर जयगड - मुंबई गाडीचे वाहक व्ही. के. देसाई, चालक एस. एस. कांबळे यांनी बसचा ताबा घेतला होता. परंतु दोन्ही गाड्यांना जलसमाधी मिळाल्यामुळे काहीच माहिती उपलब्ध होत नव्हती. परंतु जीपीएस यंत्रणेमुळे मुंबई सेंट्रल येथील संगणकप्रणालीव्दारे माहिती मिळवण्यात आली. त्यातून चालक - वाहकांसह एकूण ३१ प्रवासी असल्याची माहिती मिळाली. ड्युटी संपलेल्या चालक - वाहकांचे महाड येथे जबाब नोंदवण्यात आले. राजापूर गाडीत १७ आणि जयगड गाडीतील १० प्रवाशांसह दोन्ही गाड्यांचे चालक - वाहक मिळून एकूण ३१ जण होते.प्रश्न : रत्नागिरी जिल्ह्यात ब्रिटिशकालीन ११ पूल असून, त्याची आयुर्मर्यादा संपली आहे, सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर किती मार्गावरील वाहतूक बंद केली आहे अथवा काय सूचना दिली आहे का?उत्तर : वाहतूक बंद किंवा चालू ठेवण्याबाबत एस. टी.ला सार्वजनिक बांधकाम विभागाचे पत्र आवश्यक असते. परंतु जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन ११ पुलांची आयुर्मर्यादा संपली असली तरी संबंधित मार्गावरील वाहतूक बंद करण्याबाबत कोणतेही शासकीय आदेश अद्याप एस. टी. प्रशासनाला प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे सध्या तरी या मार्गावरील वाहतूक सुरू आहे.प्रश्न : दुर्घटनेवेळी एस. टी.च्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी नेमकी काय भूमिका बजावली?उत्तर : सावित्री नदीवरील दुर्घटनेमुळे एस. टी.चा सर्व कर्मचारीवर्ग हळहळला. प्रत्यक्ष ठिकाणी कर्मचारी, अधिकारी होतेच, परंतु प्रत्येक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपापली जबाबदारी नेटाने पूर्ण केली. माझ्याबरोबर विभागीय सहाय्यक वाहतूक अधिकारी, सुरक्षा व दक्षता अधिकारी, प्रशिक्षणार्थी चालकांचे संपूर्ण पथक, तपासणी पथक, खेड व चिपळूण आगार व्यवस्थापक व त्यांचे सहकारी दुर्घटनास्थळी होते. राजापूर ते आंबेत सागरी मार्गावर तपासणीसाठी कर्मचाऱ्यांचे पथक कार्यरत होते. अजून आंबेत येथे एक पथक आहे. शिवाय राजापूर, चिपळूण, रत्नागिरी येथे नियंत्रण कक्ष असून, नातेवाईकांना माहिती देण्यात येत आहे. मृत २० प्रवाशांच्या नातेवाईकांना १० हजारांची तत्काळ मदत देऊन त्यांचे सांत्वन करण्यात आले आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच हजार रुपये देण्यात आले आहेत.प्रश्न : गाडीत प्रवासी बसल्यानंतर तिकीट रकमेतून प्रवासी विम्याचा एक रूपया घेण्यात येत होता. विम्याची रक्कम प्रवाशांना मिळणार आहे का? उत्तर : प्रवासी गाडीत बसल्यानंतर इच्छितस्थळी उतरेपर्यंत अर्थात् त्या प्रवासापर्यंत विमा असतोे. मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना एकूण किती रक्कम द्यावयाची, याबाबत अद्याप कोणताही लेखी आदेश प्राप्त झालेला नाही. आदेश प्राप्त झाल्यावर त्याप्रमाणे अंमलबजावणी केली जाणार आहे. प्रश्न : एस. टी.चे एकूण किती नुकसान झाले आहे ? उत्तर : एस. टी.तील अजून नऊ प्रवासी व बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेणे सुरू आहे. फलक व बंपरव्यतिरिक्त काहीच सापडलेले नाही, त्यामुळे एकूण किती नुकसान झाले, हे अजून निश्चित करण्यात आलेले नाही.- मेहरून नाकाडेअद्याप नऊजण बेपत्ताराजापूर - बोरिवली व जयगड - मुंबई गाड्यांमधे प्रवासी, चालक व वाहक मिळून एकूण ३१ जण होते. जयगड-मुंबईमध्ये १२ व राजापूर - बोरिवली गाडीत १९ जण होते. पैकी आतापर्यंत २२ मृतदेह सापडले असले तरी नऊजण बेपत्ता आहेत. दुर्घटनेला आठवडा झाला तरी एकाही गाडीचा शोध लागलेला नाही. तत्पर कामगिरीमहाड येथील दुर्घटनेवेळी सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांनी चांगली कामगिरी बजावली. आंबेत येथे अजूनही एस. टी.चे शोधपथक कार्यरत आहे. एस. टी.चे तपासणी पथक, प्रशिक्षणार्थींचे पथक महाडमध्ये आहे. बेपत्ता प्रवाशांच्या नातेवाईकांना माहिती देणे, तत्काळ मदत देणे, मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनानंतर घरी पोहोचवणे, ही कामे जबाबदारीने सुरू आहेत.