शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

परशुराम घाटात दरड कोसळली, स्थानिक ग्रामस्थ भयभीत

By संदीप बांद्रे | Updated: July 8, 2023 17:38 IST

चिपळूण : सलग पडणाऱ्या पावसामुळे परशुराम घाटातील डोंगराची एक बाजू माती आणि दगडासह थेट खाली आली. सुदैवाने वाहतूक सुरू ...

चिपळूण : सलग पडणाऱ्या पावसामुळे परशुराम घाटातील डोंगराची एक बाजू माती आणि दगडासह थेट खाली आली. सुदैवाने वाहतूक सुरू असलेल्या रस्त्यावर माती आणि दगड आले नाहीत. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे सुरळीत सुरू होती. परंतु परशुराम गावाकडील हा डोंगर हळूहळू खाली येत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. ठेकेदार कंपनीने दरडीची माती व दगड बाजूला करण्याचे काम सुरू केले आहे.मुंबई गोवा महामार्गावरील अत्यंत महत्वाचा घाट असलेल्या परशुराम घाटात पावसाळ्यात दरड कोसळणे हे नेहमीचे समीकरण राहिले आहे. दरडीची माती आणि दगड थेट महामार्गावर येऊन येथील वाहतूक ठप्प पडण्याचे व पर्यायाने महामार्गावरील वाहतूक बंद पडण्याचे प्रकार सातत्याने घडत होते. तसेच घाटाच्या पायथ्याशी असलेल्या पेढे गावाला या दरडीचा सतत फटका बसत होता. त्यामुळे पेढे गावाला संरक्षण म्हणून येथे भली मोठी संरक्षण भिंत उभारण्यात आली. परंतु दुसऱ्या बाजुचा डोंगर मात्र नेहमीप्रमाणे धोक्याची घंटा देत आहे. डोंगराची माती आणि दगड सातत्याने खाली सरकत आहेत. त्यामुळे दरडीचा धोका येथे कायम राहिला आहे.चिपळुणात गुरुवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. सलग पडणाऱ्या या पावसामुळे पुन्हा एकदा परशुराम घाटात दरड खाली आली. परंतु सुदैवाने ती वाहतूक सुरू असलेल्या मार्गावर आली नाही. वाहतूक सुरू असलेल्या रस्त्यावर दरडीची माती दगड येऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात आलेली आहे. तरी देखील दरडीचे काही दगड रस्त्याच्या कडेला येऊन पडले, परंतु वाहतुकीला त्याचा अडथळा झालेला नाही. वाहतूक पूर्णपणे सुरळीत राहिली आहे. दरड कोसळल्याचे समजताच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी तसेच पोलिसांनी धाव घेऊन पाहणी केली व ठेकेदार कंपनीला तात्काळ सूचना देऊन माती व दगड बाजूला करण्याचे आदेश दिले. त्यानुसार येथे कामाला सुरुवात करण्यात आली आहे. दरडीचा परिणाम वाहतुकीवर झाला नसला तरी परशुराम गावातील ग्रामस्थ मात्र भयभीत झाले आहेत. हळूहळू डोंगरच खाली येत असल्याने येथील घरांना धोका निर्माण झाला आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणlandslidesभूस्खलन