शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

..अखेर परशुराम घाट वाहतूकीस खुला, नियम व अटी लागू; गेल्या १० दिवसापासून होता बंद

By संदीप बांद्रे | Updated: July 14, 2022 16:01 IST

हलक्या वाहनांसाठी पर्यायी असलेल्या चिरणी व शेल्डी मार्गावरूनच वाहतूक सुरू राहणार आहे.

संदीप बांद्रेचिपळूण : गेल्या १० दिवसापासून बंद असलेला धोकादायक परशुराम घाट अखेर वाहतूकीस खुला झाला आहे. मात्र काही नियम व अटी लागू केल्या आहेत. या घाटात सकाळी ६ ते सायंकाळी ७ पर्यंत एकेरी मार्गावर केवळ अवजड वाहतूक सुरू राहणार आहे. तर सायंकाळी ७ ते सकाळी ६ पर्यंत घाट बंद राहणार आहे. घाटातील वाहतूक सुरू करताना विविध उपाययोजना राबविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. हलक्या वाहनांसाठी पर्यायी असलेल्या चिरणी व शेल्डी मार्गावरूनच वाहतूक सुरू राहणार आहे.परशुराम घाटाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण-रायगड, रत्नागिरी, पोलीस व परिवहन विभाग तसेच उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडून अभियाप्राय मागवले होते. परशुराम घाटातील वाहतूक सुरू करण्यासाठी लोटे व खेर्डी येथील कंपन्या, शाळा महाविद्यालयांनीही निवेदन दिली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नियम अटी घालून घाटातील वाहतूक सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.त्यानुसार सकाळी ६ ते सायंकाळी ७ पर्यंत अवजड वाहनांच्या एकेरी वाहतुकीबाबतचे नियोजन उपविभागीय दंडाधिकारी खेड व चिपळूण, उपविभागीय पोलीस अधिकारी खेड व चिपळूण आणि कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, विभाग पेण-रायगड व रत्नागिरी यांनी संयुक्तपणे करण्याचे आहे. दोन अवजड वाहनांमध्ये किमान 50 ते 100 मीटर इतके अंतर असावे. वाहनांचा वेग ताशी 20 ते 30 किलोमीटर असावा. घाटात दरड प्रवणग्रस्त भागात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तिथे जेसीबी, क्रेन, पोकलेन, अॅम्ब्युलन्स, रस्सी, टॉर्च, अग्नीशामक वाहन आदींची व्यवस्था करावी. जबाबदार अधिकाऱ्यांसह पुरेसे मनुष्यबळ 24 तास मदत व बचाव कार्यासाठी ठेवावे.रोडच्या बाजुस रिफ्लेक्टर लावावेत. घाटातील वाहतुक कधी सुरू अथवा बंद राहील, याबाबत घाटाच्या सुरुवातीस व घाटाच्या शेवटी तशा आशयाची वाहतुकीची चिन्हे व ठळकपणे दिसणारे फलक लावावेत, अशाही सूचना जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी