शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पंधरामाड धूप बंधारा कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 18:37 IST

भागातील ४० कुटुंबीयांचे जीव मुठीत

आॅनलाईन लोकमतरत्नागिरी, दि. २४ : रत्नागिरी शहरातील पंधरामाड भागातील सागरी धूप प्रतिबंधक बंधारा उधाण भरतीच्या तडाख्यात सापडून अधिकच कोसळला आहे. किनाऱ्याला धडक देणाऱ्या महाकाय सागरी लाटांमुळे धूपप्रतिबंधक बंधारा जागोजागी खचला आहे. अनेक ठिकाणी बंधाऱ्याला भगदाड पडले आहे, यामुळे या भागातील ४० कुटुंबीयांना जीव मुठीत धरून जीवन जगावे लागत आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कोट्यवधी रुपये खर्च करूनही या धूपबंधाऱ्याचे काम योग्यरित्या झालेले नाही. मिकरवाडा बंदराच्या सुरक्षिततेसाठी सागरात उभारण्यात आलेल्या वाय आकाराच्या ब्रेक वॉटर वॉलमुळेही पंधरामाड व मिऱ्या किनाऱ्याकडे पाण्याचा करंट वाढल्याने पंधरामाडसह मिऱ्या गावही सागरी अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याचा आरोप येथील स्थानिकांकडून केला जात आहे.

शहरातील पंधरामाड सागरी किनारा तसेच शहराबाहेरील मिऱ्या, जाकीमिऱ्या या गावांच्या सागरी किनाऱ्यावर गेल्या काही वर्षांपासून सागरी आक्रमण सुरू आहे. त्यामुळे या भागातील जमीन सागराने गिळंकृत केली आहे. जनतेच्या सुरक्षिततेसाठी स्थानिकांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर काही टप्प्यांमध्ये या किनाऱ्यावर धूपप्रतिबंधक बंधारा उभारण्यात आला. त्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले. मात्र, या बंधाऱ्यासाठी मोठा दगड वापरला जावा, तरच हा बंधारा सागरी लाटांच्या तडाख्याला तोंड देईल, अशी अट बंधारा उभारणाऱ्या ठेकेदाराला घालण्यात आली होती. त्याचे पालन झाले नसल्यानेही बंधारा ढासळत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

शनिवारीही उधाणाच्या भरतीच्या तडाख्याने पंधरा माड येथील धूपप्रतिबंधक बंधारा खचून भगदाड पडले व दगड सागराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. त्यानंतर रविवारी दुपारी आलेल्या अमावास्येच्या सागरी उधाणामुळे व महाकाय लाटांमुळे तर या धूप बंधाऱ्याचे कंबरडेच मोडले आहे. अनेक ठिकाणी हा बंधारा खचून कोसळला आहे. त्यामुळे सागरी लाटा बंधाऱ्यावरून नागरी वस्तीत प्रवेश करू लागल्या आहेत.