शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
6
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
7
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
8
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
9
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
10
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
11
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
12
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
13
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
14
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
15
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
16
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
17
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

औरंगाबाद येथील फरारी आरोपी पालीत अटकेत

By admin | Updated: January 23, 2016 23:24 IST

अनेक गुन्हे : बाजारपेठेत फिरत असताना केली कारवाई

पाली : औरंगाबाद शहरातील सिडको पोलीस ठाण्यात अनेक अत्यंत गंभीर गुन्ह्यांची नोंद असणारा महत्त्वाचा फरारी असणारा आरोपी पाली पोलीस दूरक्षेत्राच्या चाणाक्ष कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे पाली बाजारपेठेत फिरत असताना पकडला. यानंतर औरंगाबाद पोलिसांना बोलावून त्यांच्या ताब्यात त्याला देण्यात आले. यासंदर्भात पाली पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेल्या माहितीनुसार गतवर्षी औरंगाबाद शहरातील सिडको पोलीस ठाण्यामध्ये आरोपी रघुनाथ बन्सीलाल मानधाने (७०, भीमणी, ता. जि. उस्मानाबाद) याच्यावर भा. दं. वि. क. ३७६, ३०७, ३७७, ३७०, १०९ व बालके कायदा कलम ५, ६, १२, १६, १७ अन्वये गुन्हा दाखल झालेला होता. या गंभीर गुन्ह्यांच्या तपासकामी औरंगाबाद पोलिसांना त्याची आवश्यकता होती. परंतु जामीनावर बाहेर असताना तो तेथून पोलिसांच्या नजरेआड होऊन फरार झाला होता. पोलिसांची चाहुल लागताच सहा ते सात वेळा त्याने पोलिसांना हुलकावणी दिलेली होती. तेथून तो पुन्हा नवीन जागी स्थलांतर करत होता. त्यामुळे पोलिसांनी तपासकामी अत्यंत आवश्यक असणाऱ्या फरारी आरोपीचे छायाचित्र व माहिती व्हॉट्सअ‍ॅपद्वारे सर्व पोलिसांना कळवली होती. त्याच्या आधारे पाली बाजारपेठेत गस्त घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना एक संशयास्पद हालचाली करणारी व्यक्ती आढळली. त्याची अधिक चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु व्हॉट्सअ‍ॅपवरचे त्याचे छायाचित्र दाखवल्यावर त्याने आपली खरी माहिती दिली. यावरून त्याला पाली पोलीस दूरक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ ताब्यात घेऊन औरंगाबाद पोलिसांना त्याची माहिती दिली. पाली पोलीस प्रशासनाने ताबडतोब औरंगाबाद पोलिसांना संशयित आरोपी ताब्यात घेण्यासाठी बोलावले. त्यांनी येऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. पाली पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता भोसले, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कदम यांनी ग्रामीण पोलीस निरीक्षक महेश थिटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी केली. (वार्ताहर)