शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

Ganpati Festival - दिव्यांगत्त्वावर मात- बांधाच्या मातीपासून शिकला गणेशमूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 12:29 IST

अंगी जिद्द आणि चिकाटी असेल तर दिव्यांगत्त्वावरही मात करता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे राहुल चंद्रकांत गोळपकर. लहानपणी बांधाच्या मातीपासून मूर्ती करण्याची कला अवगत केलेला राहुल आता गणपतीच्या सुबक मूर्ती रेखाटतो. दिव्यांग असूनही आत्मनिर्भर कसे व्हावे, हे राहुलकडूनच शिकावे.

ठळक मुद्दे दिव्यांगत्त्वावर मात- बांधाच्या मातीपासून शिकला गणेशमूर्तीराहुल गोळपकर याने आत्मनिर्भरतेचा दिला संदेश

अरुण आडिवरेकर रत्नागिरी : अंगी जिद्द आणि चिकाटी असेल तर दिव्यांगत्त्वावरही मात करता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे राहुल चंद्रकांत गोळपकर. लहानपणी बांधाच्या मातीपासून मूर्ती करण्याची कला अवगत केलेला राहुल आता गणपतीच्या सुबक मूर्ती रेखाटतो. दिव्यांग असूनही आत्मनिर्भर कसे व्हावे, हे राहुलकडूनच शिकावे.रत्नागिरी तालुक्यातील कासारवेली - पारवाडी येथे राहुल राहतो. लहानपणापासूनच तो मूकबधीर आहे. तर एका कानाने त्याला ऐकताही येत नाही. आपल्यातील कमतरता त्याने जगण्याच्या आड कधीच येऊ दिली नाही. लहानपणी शेताच्या बांधापासून गणेशमूर्ती करण्याची त्याला आवड जडली. त्यातून हळूहळू तो शाडूच्या मातीची गणेशाची मूर्ती तयार करू लागला. मूकबधीर शाळेत प्रवेश घेतल्यानंतर त्याला त्यातील बारकावे शिकायला मिळाले. आज तो गणेशाच्या मूर्ती स्वत: रेखाटतो.एका कारखान्यातील काम आटोपले की, दुसऱ्या कारखान्यात काम करण्यास तो पुन्हा तयार असतो. गणेशमूर्तीच्या कलेबरोबरच राहुल सुतारकाम आणि वेल्डिंगचेही काम करतो. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तो घरातही मदत करतो. राहुल याच्या चिकाटीने आत्मनिर्भरतेचा खरा संदेश दिला.तहान-भूक विसरतोराहुल सहाव्या वर्षापासून मूर्तीकला शिकला. गेली ६ वर्षे तो सुरेश करंजगावकर यांच्या कारखान्यात काम करतो. तर कधी मूर्ती सजावटीसाठी अन्य ठिकाणी जातो. हे काम करताना तो तहान-भूक विसरून रात्रभर मग्न राहतो.घरच्यांचेही पाठबळराहुलची घरची परिस्थिती बेताचीच आहे. आई, वडील, भावासोबत राहणाऱ्या राहुलला घरच्यांचे पाठबळ मिळते. तो घरातील गणपती स्वत:च काढतो. तर गावातील देवीची मूर्तीही रेखाटतो. मोठ्या मूर्ती रेखाटण्याची त्याची प्रबळ इच्छा आहे. 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवRatnagiriरत्नागिरी