शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

अन्यथा शिवसैनिकही गप्प बसणार नाही!

By admin | Updated: October 21, 2016 01:03 IST

सूर्यकांत दळवी : गद्दारांना पाठीशी घालत असाल तर खबरदार!

दापोली : विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडी स्थापन करून शिवसेनेच्या विरोधात उघडउघड काम करणारे प्रदीप सुर्वे, सुधीर कालेकर, भगवान घाडगे, संतोष गोवले यासारख्या गद्दारांना जर कोणी नेता पाठीशी घालत असेल आणि आपल्या स्वार्थासाठी ज्या गद्दारांची पदांवर वर्णी लावण्याचा प्रयत्न करणार असेल, तर आम्ही सच्चे शिवसैनिक हे कदापी सहन करणार नाही. त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा देत माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी गद्दारांविरूध्दच्या एल्गाराला सुरूवात केली. दापोली, मंडणगड, खेड तालुक्यांचे तालुकाप्रमुख व उपजिल्हाप्रमुख बदलण्याच्या हालचालींना वेग आला असून, या पार्श्वभूमीवर दापोली, मंडणगड ग्रामीण तसेच मुंबई तालुका कार्यकारिणीची संयुक्त बैठक दापोलीतील पेन्शनर्स सभागृह येथे घेण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना दळवी हे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत दापोली, मंडणगडमधून १७ हजारांचे मताधिक्य गीते यांना मिळाले. विधानसभा निवडणुकीत या दोन्ही तालुक्यातून स्वबळावर लढताना ९ हजार ५००चे मताधिक्य मिळाले. विधानसभेच्या निसटत्या पराभवानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही ५० पैकी ४४ ग्रामपंचायतींवर भगवा फडकला. राष्ट्रवादीच्या ताब्यातील ६ पैकी ४ ग्रामपंचायती शिवसेनेने स्वबळावर ताब्यात घेतल्या. याउलट लोकसभेला खेडमध्ये ९ हजार ५०० मते कमी तर विधानसभेला ९५०० मतांचा फटका बसला असतानासुध्दा खेडच्या नेतृत्वात बदल न करता, जिथे चांगले काम चालले आहे, त्या दापोली, मंडणगडमध्ये तालुकाप्रमुख बदलण्याच्या हालचाली होत आहेत. इतकेच नव्हे तर त्यासाठी गद्दारांची नावे पुढे आणली जात आहेत. त्यामुळे हे कुटील कारस्थान हाणून पाडल्याशिवाय इथला शिवसैनिक गप्प बसणार नाही. यासाठी आपण लवकरच पक्षप्रमुख उध्दवजींची भेट घेणार असल्याचे सांगत, तेच आम्हाला न्याय देतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. वर्तमानपत्रातील आपण भाजपच्या वाटेवर असल्याच्या गद्दारांनीच पेरलेल्या बातम्यांचा खरपूस समाचार घेताना ते म्हणाले की, आम्ही कालही शिवसैनिक होतो, आजही शिवसैनिक आहोत आणि उद्याही शिवसैनिकच राहू. गद्दारांविरूध्द आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांविरूध्द जो काही लढा द्यायचा आहे, तो यापुढे अधिक निष्ठेने आणि तीव्रतेने देऊ. कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता एकजुटीने कामाला लागावे व आगामी नगरपंचायत व जिल्हा परिषद निवडणुकीत गद्दारांबरोबरच विरोधकांना धूळ चारून भगवा डौलाने फडकवूया, असे आवाहन केले. यावेळी दापोली तालुकाप्रमुख शांताराम पवार, मंडणगड तालुकाप्रमुख राजू घोसाळकर, मंडणगड मुंबई संघटक शंकर गावणूक, दाभोळ विभागप्रमुख सुधीर वैद्य, पालगड विभागप्रमुख कासम महालदार, उन्हवरे विभागप्रमुख प्रभाकर गोलांबडे, अनंत वाजे, मुंबई विभागप्रमुख प्रवीण घाग, उपसभापती उन्मेष राजे, किशोर देसाई, उपजिल्हाप्रमुख राजू निगुडकर, आंजर्ले विभागप्रमुख राजेंद्र कदम, बुरोंडी विभागप्रमुख सुनिल कुळे आदींनीही गद्दारांचा समाचार घेतला. (प्रतिनिधी)