शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील विसर्जनस्थळी अन्य वाहनांना मनाई, ३ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश

By शोभना कांबळे | Updated: September 18, 2023 19:03 IST

रत्नागिरी : विसर्जनादिवशी मांडवी समुद्रकिनारी विसर्जन ठिकाणी गणपती मूर्ती घेऊन येणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त व गणपती विसर्जनासाठी असलेल्या वाद्यांच्या वाहनांव्यतिरिक्त अन्य ...

रत्नागिरी : विसर्जनादिवशी मांडवी समुद्रकिनारी विसर्जन ठिकाणी गणपती मूर्ती घेऊन येणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त व गणपती विसर्जनासाठी असलेल्या वाद्यांच्या वाहनांव्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारच्या दुचाकी, तीन चाकी, चारचाकी अशा सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच भाट्ये बस स्टॉप येथून भाट्ये समुद्र किनाऱ्याकडे जाणारा रस्तासुद्धा एकेरी असल्याने अन्य वाहनांना प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे.गणपती विसर्जनाच्या दिवशी विसर्जनासाठी गणपती ठेवलेल्या वाहनांव्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारच्या दुचाकी, तीन चाकी, चार चाकी अशा सर्व प्रकारच्या वाहनांना २० सप्टेंबर रोजी (दीड दिवस), २३ सप्टेंबर रोजी (पाच दिवस) गौरी गणपती विसर्जन, २४ सप्टेंबर (सहा दिवस), २६ सप्टेंबर (आठ दिवस) आणि २८ सप्टेंबर (दहा दिवस) अनंत चतुर्दशी प्रवेश बंद करण्याबाबतचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केले आहेत.या दिवशी भुते नाका ते मांडवी समुद्र किनारा या दरम्यान मांडवी समुद्रकिनारी विसर्जन ठिकाणी गणपती मूर्ती घेऊन येणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त व गणपती विसर्जनासाठी सोबत असणाऱ्या वाद्यांच्या वाहनांव्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारच्या दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. भाट्ये बस स्टॉप येथून भाट्ये समुद्र किनाऱ्याकडे जाणारा रस्तासुद्धा एकेरी असल्याने अन्य वाहनांना विसर्जन दिनी प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

३ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेशजिल्ह्यात १८ ते २८ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव तसेच २८ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद हे सण साजरे होणार आहेत. या सणांना कुठलेही गालबोट लागू नये, ते शांततेत साजरे व्हावेत, यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी यांनी १८ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून ३ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी