शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी: ‘कोकण सारथी’ सागरी नौका भ्रमण मोहिमेचे आयोजन

By मेहरून नाकाडे | Updated: November 5, 2022 18:08 IST

या मोहिमेत रत्नागिरी, कोल्हापूर, सावंतवाडी, मुंबई, पुणे, नागपूर येथील नौसेना, स्थलसेना, वायूसेना मधील छात्र सहभागी होणार आहेत.

रत्नागिरी : महाराष्ट्र दोन नेव्हल एनसीसी रत्नागिरी विभागातर्फे ‘कोकण सारथी’ सागरी नौका भ्रमण मोहिम दि.१५ ते दि.२४ नोव्हेंबर अखेर आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेतंर्गत ‘प्लास्टिक मुक्त’ समुद्र किनाऱ्याबाबत पथनाट्याव्दारे संदेश देण्यात येणार असल्याची माहिती कमांडिंग ऑफीसर के. राजेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.‘कोकण सारथी’ सागरी नौका भ्रमण मोहिमेत एन.सी.सी अधिकारी, २५ मुली व ३५ मुलगे मिळून एकूण ६० छात्र सहभागी होणार आहेत. नौका भ्रमण मोहिम गेली १२ वर्षे आयोजित करण्यात येत आहे. सध्याचे वातावरण, हवामान नौका भ्रमणासाठी अनुकूल असल्याने आयोजन केले आहे. या मोहिमेत २७ फूट सेलिंग व्हेलर तीन बोटी, शिडाच्या नौका, व छात्र सैनिकांच्या सुरक्षततेच्या दृष्टीकोनातून एक मोठी मच्छिमार नौका व दोन मध्यम यांत्रिक बोट सहभागी होणार आहेत.‘कोकण सारथी’ सागरी मोहिमेचा शुभारंभ दि.१५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता भगवती बंदर येथे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. रत्नागिरी ते वरवडे, वरवडे ते जयगड, जयगड ते तवसाळ व परत, जयगड ते बोऱ्या व परत, जयगड ते दाभोळ, दाभोळ ते धोपावे व परत, दाभोळ ते अंजनवेल-वेलदूर व परत, दाभोळ ते जयगड, जयगड ते काळबादेवी, काळबादेवी ते रत्नागिरी येथे दि.२४ नोव्हेंबर रोजी मोहिमेची सांगता होणार आहे.या मोहिमेत रत्नागिरी, कोल्हापूर, सावंतवाडी, मुंबई, पुणे, नागपूर येथील नौसेना, स्थलसेना, वायूसेना मधील छात्र सहभागी होणार आहेत. सध्या मिस्त्री हायस्कूल येथे पूर्व सागरी मोहिम कॅम्प सुरू असून राज्यभरातील १२० छात्र सहभागी झाले असून त्यातील ६० छात्रांची निवड ‘कोकण सारथी’ सागरी मोहिमेसाठी केली आहे.या मोहिमेतंर्गत छात्र सैनिक बंदरांना भेटी देत असताना, सागराच्या पाण्याशी झुंज देत, लाटांचा सामना करीत दर्यावर्दी जीवनाचा अनुभव घेतानाच बंदरानजीक लोकवस्तीत पथनाट्याच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्ती व समुद्र किनारे स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करणार असल्याचे कमांडिंग ऑफीसर के. राजेश कुमार यांनी सांगितले.छात्र सैनिकांना पाण्यातील साहसी व धाडसीवृत्तीला चालना देणे त्यासाठी विश्वास, शक्ती, मानसिकवृत्ती बळकट करणे, दर्यावर्दी जीवनाचा अनुभव प्राप्त करणे हा या मोहिमेमागचा उद्देश्य आहे. शिडाच्या बोटीतील केवळ कॅनव्हासच्या शिडाच्या (सेल) माध्यमातून १७७ नॉटिकल मैल व ३३२ किलोमीटर प्रवास केला जाणार आहे. या बोटीला कोणतेही यांत्रीक साधन नसताना केवळ शिडाच्या माध्यमातून भरती, ओहोटी वाऱ्याचा वेग व पाण्याचा प्रवाह याचा अभ्यास करून बोटीच्या माध्यमातून पाण्यावरील धाडसी साहस छात्र सैनिक करून दाखवणार आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी