शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

कांद्याने मारले...तरी भाज्यांनी तारले

By admin | Updated: August 23, 2015 00:41 IST

बजेट कोलमडलेले : भाज्या स्वस्त झाल्यामुळे महिला सुखावल्या

रत्नागिरी : कांद्याच्या दराने उचल खाल्ली आहे. त्यामुळे गृहिणींना बजेट जुळविणे अवघड बनले आहे. मात्र त्याचवेळी भाज्यांचे दर खालावले असल्याने महिलावर्ग सुखावला आहे. रत्नागिरीतील नियमित बाजाराबरोबरच आठवडा बाजारातही कांदा ७० रूपये किलो दराने विकला जात आहे. कांद्याप्रमाणे लसणीचे दरही वधारले आहेत. १२० ते १६० रूपये किलो दराने लसूण विकण्यात येत आहे. अर्थात बटाटा मात्र २० रूपये किलो दरावर स्थिर आहे. पावसामुळे कांद्याचे पीक वाया गेल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळेच दरात मोठी वाढ झाली आहे. कांदा वधारला असला तरी भाज्यांचे दर मात्र खालावले आहेत. भाज्यांची आवकही वाढली आहे. बाजारात मटार मुबलक स्वरूपात विक्रीस उपलब्ध आहे. श्रावणामुळे भाज्यांना मागणी वाढली आहे. गावठी भाज्याही भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. गावठी भेंडी, दोडकी, पडवळ, भोपळा, काकडीदेखील बाजारात येऊ लागले आहे. भेंडी १० रूपयाला तीन जुड्या तर पडवळ दोडकी १० ते १५ रूपये प्रति नग दराने विकण्यात येत आहेत. याशिवाय काकडी २० रूपये किलो असली तरी मोठ्या काकड्या २० ते ४० रूपये प्रति नग विकण्यात येत आहेत. चिबूड ४० ते ६० रूपये दराने विकण्यात येत आहे. कापलेल्या भोपळ्याच्या शेडीची १० रूपये दराने विक्री सुरू आहे. मका १० ते १५ रूपये प्रति नग तर ओल्या भुईमुगाच्या शेंगा ४० ते ५० रूपये किलो दराने विकण्यात येत आहेत. कोथींबीर जुडी १० ते १५, मेथी, पालक, मुळा, शेपू, माठ, कांदापात, चवळी, मोहरी, आंबाडीची जुडी ७ ते १० रूपये दराने विकण्यात येत आहेत. श्रावण असल्याने अळुवडीची, हळदीची पानेही विक्रीस उपलब्ध आहेत. बाजारात फळांची आवकही वाढली आहे. सिमला सफरचंद, छोट्या आकारातील सफरचंद मुबलक स्वरूपात उपलब्ध आहे. ओला खजूर पॅकींग ७० ते ९० रूपये, केळी ४० ते ६० रूपये डझन, दराने विकण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)