खेड : रेल्वेची धडक बसून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना २३ मे राेजी सायंकाळी ४़ ३० वाजता माैजे शिरवली (ता़ खेड) नजीक रेल्वे रुळावर घडली़ लीलाधर काशिराम बडबे (३५, रा़ निळवणे, सिद्धीविनायक नगर, खेड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे़
या अपघाताबाबत काेकण रेल्वेतील पाॅईंटमन अनंत नारायण इंदुलकर (५३, रा़ आसूद, ता़ दापाेली) यांनी माहिती दिली़ अनंत इंदुलकर हे माैजे शिरवलीनजीक रुळावर पाहणी करत असताना त्यांना रुळावर मृतदेह दिसला़ त्यांनी याबाबत रेल्वे स्थानकात माहिती दिली़ त्यानंतर खेड पाेलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली़ पाेलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला़ या अपघाताची आकस्मिक मृत्यू म्हणून नाेंद करण्यात आली असून, अधिक तपास खेड पाेलीस करत आहेत़