शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्याचे हल्ले; रत्नागिरी जिल्ह्यात जखमींना मिळाली 'इतक्या' कोटीची भरपाई

By संदीप बांद्रे | Updated: December 6, 2024 18:16 IST

संदीप बांद्रे चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात मागील चार वर्षांत वन्यप्राण्यांनी तब्बल १९ जणांवर प्राणघातक हल्ले केले. या हल्ल्यात चारजणांचा ...

संदीप बांद्रेचिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात मागील चार वर्षांत वन्यप्राण्यांनी तब्बल १९ जणांवर प्राणघातक हल्ले केले. या हल्ल्यात चारजणांचा मृत्यू झाला. तसेच १४ जण गंभीर जखमी, तर एकजण किरकोळ जखमी झाला. यातील मृतांच्या नातेवाइकांना आतापर्यंत ९८ लाख १५ हजार ४४५ रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. बिबट्या, रानगवा, रानडुक्कर, अस्वल, माकड या वन्यप्राण्यांच्या व काहीजण मगरीच्या हल्ल्यात जखमी झाले. विशेष म्हणजे बिबट्याच्या हल्ल्यात एकाचाही मृत्यू झालेला नाही. मात्र रानगाव, रानडुक्कर व अस्वलाच्या हल्ल्यात ४ जणांचा मृत्यू झाला.

गेल्या काही वर्षांपासून मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा संचार वाढला आहे. जिल्ह्यात सह्याद्री खोऱ्याच्या पायथ्याला असलेल्या गावांत वन्यप्राण्यांच्या हालचाली कायम दिसून येतात. विशेषत: बिबट्या, रानडुक्कर, रानगवा, माकड या प्राण्यांचा संचार अधिक वाढला आहे. यामध्ये एखाद्यावेळी मानवी हस्तक्षेप घडल्यास त्यामध्ये वन्यप्राण्यांकडून हल्ले झाल्याचे प्रकार घडतात.बिबट्याचा वावर मानवी वस्तीजवळ कोंबडी, कुत्री खाण्याच्या उद्देशाने होत असल्याने त्यातून काहींवर हल्ल्याचे प्रकार घडले आहेत.मात्र बिबट्याच्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले असले तरी त्यात कोणाचा मृत्यू झालेला नाही. त्याउलट रानगवा, रानडुक्कर, अस्वल यांच्या हल्ल्यात काहींचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये २०२२-२३ मध्ये सतीश शांताराम जाधव (फुरूस), भिकाजी राघू माडवकर (माचाळ, लांजा), तसेच तुकाराम बाळू बडदे (तळसर, चिपळूण) यांच्यावरही रानगव्याने हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाला. अरुण रेडीज यांचा रानडुकराच्या हल्ल्यात (चांदेराई, रत्नागिरी) मृत्यू झाला होता. त्यातील काहींना २० लाख तर काहींना १५ लाखाची नुकसान भरपाई देण्यात आली होती. या व्यतिरिक्त गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना ५ लाख तर किरकोळ जखमी झालेल्यांना १० हजार रुपयांची मदत देण्यात आली होती.

सह्याद्री खोऱ्यातील तळसर चिपळूण, पातेपिलवलीतर्फे वेळंब, शेवरवाडी नांदगाव, खानू नवीवाडी लांजा, तसेच फुरूस, पन्हाळकाजी दापोली, चिंचघर खेड, चांदेराई रत्नागिरी, दोडवली गुहागर, ताडील दापोली, साखरपा संगमेश्वर, पाथरट रत्नागिरी आदी ठिकाणी वन्यप्राण्यांनी मनुष्यांवर हल्ले केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्यांमध्ये अजूनही वन्यप्राण्यांविषयी दहशत कायम आहे.

वन्यप्राण्यांकडून मानवी हस्तक्षेप झाल्याशिवाय सहजासहजी हल्ला होत नाही. तरीदेखील काही गावांत वन्यप्राण्यांच्या हालचाली दिसून आल्या, तर तत्काळ वन विभागाशी संपर्क साधवा. तसेच वन हेल्पलाइनचा टोल फ्री क्रमांक १९२६ हा चोवीस तास कार्यरत असलेल्या सेवेची ग्रामस्थांनी मदत घ्यावी. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी यंत्रणा दाखल केली जाईल. - गिरीजा देसाई, विभागीय वन अधिकारी, चिपळूण

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीforest departmentवनविभाग