शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दीड कोटीचे रक्तचंदन जप्त

By admin | Updated: January 1, 2017 23:05 IST

चिपळुणमध्ये कारवाई : समुद्रमार्गे आणल्याचा वन अधिकाऱ्यांचा अंदाज

चिपळूण/अडरे : चिपळूणमध्ये रक्तचंदनाच्या तस्करीवर सलग तिसरा छापा टाकण्यात आला असून, यावेळी सर्वांत मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. शहरातील गोवळकोट परिसरात तीन ठिकाणी वन अधिकाऱ्यांनी ही कारवाई करून दोन दिवसांत दीड कोटीचे रक्तचंदन ताब्यात घेतले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या रक्तचंदनाची किंमत १० कोटींच्या घरात आहे. चिपळुणातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई ही राज्यातील सर्वांत मोठी कारवाई आहे. रक्तचंदनाची महाराष्ट्रातून समुद्रमार्गे विदेशात तस्करी करण्यात येणार असल्याचा अंदाज आहे. दि. ३० डिसेंबरला चिपळूण शहरातील गोवळकोट येथे आफ्रिन पार्क येथील अलमक्का अपार्टमेंटमधील समीर शौकत दाभोळकर यांच्या गाळ्यामध्ये रक्तचंदनाचे ९२ नग जप्त करण्यात आले. त्याचे वजन २.८५० टन असून, किंमत सुमारे ४० लाख रुपये एवढी आहे. तसेच ३१ डिसेंबरला दुपारनंतर गुहागर बायपास रोड येथे मिरजोळी गावच्या हद्दीत तात्पुरत्या उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये कागदामध्ये झाकून ठेवलेले ७२ नग, सात सोफासेटमध्ये पॅक केलेले ३२ नग असे एकूण १०४ नग जप्त केले. त्यांचे वजन ३.०८० टन इतके असून त्याची किंमत सुमारे ४० ते ५० लाख रुपये आहे. त्याच रात्री म्हणजे शनिवारी रात्री गोवळकोट रोड आफ्रिन पार्क येथे अलअब्बास या नवीन अपार्टमेंटमधील तळमजल्यातील ३ गाळ्यांमध्ये एकूण ३० सोफासेट आढळले असून, त्यात ११६ रक्तचंदनाचे नग जप्त करण्यात आले आहेत. त्याची किंमत ५० लाखापर्यंत आहे. या तीनही छाप्यांमध्ये मिळून दीड कोटींचे रक्तचंदन जप्त करण्यात आले आहे.अलअब्बास या अपार्टमेंटचे गाळा मालक अल्ताफ चिकटे यांच्याकडे पुढील तपास सुरू आहे. चिपळुणातील वन अधिकाऱ्यांनी सर्वांत मोठी कारवाई केली असल्याने सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. वन अधिकारी दक्षता कोल्हापूरचे विजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूणचे वन क्षेत्रपाल सुरेश वरक, फिरत्या पथकाचे वन क्षेत्रपाल शहाजी पाटील, वनपाल रंगराव पाताडे, रामपूर विभागाचे वनरक्षक रामदास खोत, वनरक्षक सूरज तेली, वनरक्षक रानबा बंबर्गेकर, उमेश आखाडे, फिरत्या पथकाचे वनपाल किशोर पत्की, वनरक्षक मिताली कुबल, अमित निमकर, यशवंत सावर्डेकर, उदय भागवत आदींनी ही कारवाई केली.वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विशिष्ट तंत्रशुद्ध पद्धतीने लाकडी सोफा तयार करून त्याच्या आतमध्ये नटबोल्ट व जर्मन पट्टीच्या साहाय्याने रक्तचंदन बांधण्यात आले होते. काही ठिकाणी दोन, काही ठिकाणी तीन, तर काही ठिकाणी चार नग लपवून ठेवण्यात आले होते. चिपळूण वन अधिकाऱ्यांना ही माहिती मिळताच तिन्ही ठिकाणी छापे टाकण्यात आले. या प्रकरणी संशयित ईसा हळदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही प्रकरणी वन विभागाने भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१ (२) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणातील संशयित हळदे याला वन विभागाने नोटीस बजावली असून सध्या तो फरार आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे.ही माहिती मिळताच चिपळूणचे उपविभागीय पोलिस अधिकारी महादेव गावडे यांनी वन विभाग अधिकाऱ्यांची भेट घेतली व अभिनंदन केले. (वार्ताहर)परदेशात मागणीया रक्तचंदनाला फ्रान्स, जर्मनी, जपान या देशांत मोठी मागणी असते. रक्तचंदनाचा उपयोग त्या ठिकाणी औषधासाठी केला जातो. मोठे रॅकेट असण्याची शक्यतादोन दिवसांत तीन ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमधून दीड कोटी रुपयांचे रक्तचंदन जप्त करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात रक्तचंदनाचा साठा सापडला आहे. यात फार मोठे रॅकेट असून, ते लवकरच उघड होईल, अशी अपेक्षा वनखात्याकडून व्यक्त केली जात आहे.