शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जुनी पेन्शन योजना: रत्नागिरीत संपकऱ्यांनी थाळीनाद करून केला शासनाचा निषेध

By शोभना कांबळे | Updated: March 17, 2023 18:36 IST

सर्व शासकीय कार्यालये, आरोग्य विभागाचे काम ठप्प

रत्नागिरी : शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शनच्या मुख्य मागणीसह अन्य प्रमुख मागण्यांसाठीचा राज्यस्तरीय संप शुक्रवारी चाैथ्या दिवशीही सुरूच आहे. सर्व शासकीय कार्यालये, आरोग्य विभागाचे काम ठप्प होऊनही याबाबत अद्याप शासनाची डोळेझाकपणाची भूमिका असल्याने संतप्त झालेल्या संपकऱ्यांनी शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद करत शासनाचा निषेध व्यक्त केला.जुनी पेन्शन योजना लागू करा, पीएफआरडीए कायदा रद्द करा, कंत्राटी अंशकालीन रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, सर्व विभागांतील सर्व रिक्त पदे भरण्यास तत्काळ मान्यता द्या, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांना विनाशर्त मान्यता द्या, चतुर्थ श्रेणी वाहनचालक पदे भरण्यावरील बंदी हटवा, शिक्षक-शिक्षकेतर पालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर करा, कामगार कायद्यातील बदल केलेल्या जाचक अटी तत्काळ रद्द करा, अशा प्रमुख मागण्यांचा यात समावेश आहे.सर्वच शासकीय खात्यातील कामगार, कर्मचारी या संपात मंगळवारपासून सहभागी झाले आहेत. गुरुवारपासून आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचाही या संपात सहभाग आहे. त्यामुळे शासनाची आरोग्य यंत्रणाही आता कोलमडली आहे. सामान्य जनतेची शासकीय कामे खोळंबली आहेत. मात्र, त्याचे सरकारला कोणतेच सोयरसुतक नसल्याचा आरोप या संपकऱ्यांकडून करण्यात येत आहे.गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतेक कार्यालयांचे नियमित कामकाज ठप्प झाले असून, केवळ अधिकारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कार्यालयांचा भार आहे. मात्र, शासनाला या संपाची दखल घेण्याची गरज वाटत नाही. याबद्दल या संपकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या संपकऱ्यांनी थाळीनाद करत, सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त केला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGovernmentसरकारPensionनिवृत्ती वेतन