दापोली : तालुक्यातील दाभाेळ ते केळशी या ५० किलाेमीटरच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात ऑइलचा तवंग आल्याने समुद्रकिनारा पूर्णपणे काळवंडला आहे.
दाभोळ ते केळशी परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात काळे तवंग पसरले आहेत. त्यामुळे किनारपट्टीवर अंडी घालणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांच्या प्रजननावर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. दाभोळ ते केळशी या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात समुद्री कासव अंडी घालण्यासाठी येतात. पावसाळ्यानंतर अंडी घालण्याचा त्यांचा हंगाम सुरू होतो. परंतु, किनारपट्टीवरील तवंगामुळे कासवांना धाेका उद्भवण्याची शक्यता आहे.
समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या या ऑइलमुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे आता गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या भक्तांना अडचणी निर्माण होणार आहेत. या ऑइलबद्दल मेरीटाइम बोर्ड तसेच दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील यांना माहिती देण्यात आली आहे.