शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दिशा समितीच्या बैठकीला अधिकारी जाणीवपूर्वक गैरहजर, खासदारांकडून अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत नाराजी

By अरुण आडिवरेकर | Updated: November 15, 2022 17:50 IST

केंद्र सरकारच्या विविध योजनांचा दिशा योजनेतून आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती

रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयात दिशा समितीच्या बैठकीला जाणीवपूर्वक काही अधिकारी गैरहजर राहिल्याने समितीची सभा तहकूब करण्यात आल्याची माहिती खासदार तथा दिशा समितीचे अध्यक्ष विनायक राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. आठ वर्षांत प्रथमच ही सभा तहकूब करण्याची वेळ आली आहे.केंद्र सरकारच्या विविध योजनांचा दिशा योजनेतून आढावा घेण्यासाठी मंगळवारी (१५ नोव्हेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला समितीचे अध्यक्ष खासदार विनायक राऊत आणि खासदार सुनील तटकरे उपस्थित होते. केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि पार्लमेंटच्या आदेशानुसार दिशा समिती स्थापन करण्यात आली आहे. या दिशा समितीमध्ये केंद्र शासनाच्या विविध प्रकारच्या ४३ समित्यांचा आढावा घेतला जातो. जिल्हाधिकारी हे या समितीचे सचिव आहेत.जिल्हाधिकारी हे प्रशिक्षणाला गेल्याने ते गैरहजर राहिले. तर अप्पर जिल्हाधिकारी हे मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्यामुळे खेडमध्ये गेले होते. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हे या समितीचे अजेंडा तयार करणारे असतात. या बैठकीत खासदार सुनील तटकरे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांची हजेरीच घेतली. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी गैरहजर असल्याचे समोर आले. त्यानंतर ही बैठक तहकूब करण्यात आली.बैठकीला गैरहजर राहिलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसा प्रस्ताव राज्याच्या सचिवांसह केंद्रातील संबंधित सचिवांना पाठवण्यात आला आहे, अशी माहिती खासदार विनायक राऊत व खासदार सुनील तटकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीVinayak Rautविनायक राऊत collectorजिल्हाधिकारी