शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

...आता दंडाची पावती जागेवरच !

By admin | Published: August 17, 2016 9:21 PM

पोलिसांना आदेश : वाहनचालकाला न्यायालयात हजर करण्याची आवश्यकता नाही

दापोली : वाहन चालवण्याचा परवाना नसणे, वाहनाची कागदपत्र सोबत नसणे आणि वाहन सुस्थितीत नसताना रस्त्यावर आणणाऱ्या वाहनचालकांना राज्यभरात वाहतूक पोलिसांकडून पूर्वी न्यायालयात हजर केले जात होते. मात्र, राज्यभरातील वाहतूक शाखेच्या पोलिसांना आता जाग्यावरच दंड आणि त्या दंडाची पावती फाडून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.जिल्हाभरात या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाल्याने बेशिस्त वाहनचालक धास्तावले आहेत. नवीन आदेशानुसार वाहन चालवण्याचा परवाना नसल्यास ३०० रुपये, गाडी चालवताना भ्रमणध्वनी कानाला लावलेला असल्यास १०० रुपये, धूमस्टाईल गाडी चालवताना आढळल्यास ५०० रुपये, त्याचप्रमाणे नवीन गाडी घेतल्यानंतर तिचे रजिस्ट्रेशन होण्यापूर्वीच नंबरविना चालवणे, यासाठी १ हजार रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गाडीचा इंडिकेटर तुटलेला असणे आदींसाठी दंडाची आकारणी होणार आहे. दरम्यान, दापोली पोलीस स्थानकाच्या वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी दीपक शिंंदे यांनी १२ दिवसांत ७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. गृह विभागाच्या नव्या आदेशामुळे आता वाहतूक पोलिसांना जाग्यावरच दंडाची वसुली करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. यापूर्वी अशा वाहनचालकांना न्यायालयात हजर केले जात असे. त्यानंतर न्यायालयाकडून दंड ठोठावण्यात येत असे. मात्र, या नव्या आदेशामुळे आता अशा बाबींसाठी न्यायालयात जाण्याची गरज संपुष्टात आली आहे. दरम्यान, एखाद्या चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना आहे आणि त्याने आपली गाडी दुसऱ्या व्यक्तीला मात्र जिच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नाही, अशा व्यक्तीला चालवण्यास दिल्यास आणि पोलिसांच्या तपासणीत ही बाब पुढे आल्यास गाडीच्या मालकाला ३०० रुपये आणि परवाना नसताना गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला ३०० असा एकूण ६०० रुपयांचा दंड वसूल करण्याची तरतूद आहे. त्यामुळे यापुढे आपल्या मालकीची गाडी परवाना नसलेल्या व्यक्तीला देताना दहावेळा विचार करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)