शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
4
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
5
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
6
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
7
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
8
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
9
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
10
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
11
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
12
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
13
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
14
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
15
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
16
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
18
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
19
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
20
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख

सत्तेच्या मोहासाठी नाही, बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी सत्तांतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

By मनोज मुळ्ये | Updated: January 8, 2024 15:09 IST

राजापूर : आम्हाला सत्तेचा मोह नाही. पण बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली जात होती. म्हणूनच आम्ही ठाम भूमिका घेतली आणि ...

राजापूर : आम्हाला सत्तेचा मोह नाही. पण बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली जात होती. म्हणूनच आम्ही ठाम भूमिका घेतली आणि राज्यात सत्तांतर झाले, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. राजापूरमध्ये आयोजित शिवसंकल्प मेळाव्यामध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते.कोकणाने आजवर शिवसेनेवर आणि बाळासाहेबांवर खूप प्रेम केले. त्यामुळे कोकणातील लोकांशी संवाद साधताना नेहमीच आनंद होतो. शिवसेनेसाठी मुंबई, ठाणे हे हृदय असेल तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे शिवसेनेचे फुफ्फुस आहे. कोकणाने शिवसेनेला नेहमीच ऑक्सिजन दिला आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.राज्यात झालेल्या सत्तांतराचा निर्णय सत्तेसाठी घेतला नव्हता. रोज सावरकरांचा अपमान होत होता. बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान होत होता. त्यामुळे हा निर्णय घेण्याची वेळ आली. ५० आमदार आणि १३ खासदारांनी त्यासाठी साथ दिली. अनेक नेते, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, कार्यकर्ते आमच्यासोबत आले. अजूनही येत आहेत. जर आम्ही चुकीचा निर्णय घेतला असता तर हे सर्वजण आमच्यासोबत आले असते का, असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.बाळासाहेबांनी नेहमी कार्यकर्त्यांना मोठे केले. त्यांच्या विचारांना ज्यांनी टाळले, त्यांचे काय झाले हे तुम्ही पाहिलेच असेल. अशा विघ्नसंतोषी, हिंदुत्त्वाला विरोध करणार्यांचा या निवडणुकीत नायनाट करुन टाकूया, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीEknath Shindeएकनाथ शिंदे