शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत गेली तीन वर्षे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच नाही!

By admin | Updated: April 1, 2017 12:44 IST

पालक व विद्यार्थ्यांची तीव्र नाराजी

आॅनलाईन लोकमतशिरगांव (रत्नागिरी), दि. १ : समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती गेली तीन वर्ष विद्यार्थ्यांना पोहचलीच नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केंद्र सरकारची योजना राज्य शासनाचे शालेय शिक्षण विभागाने अंमलबजावणी करण्यासाठी त्यांच्याकडे अधिकार दिलेले आहेत. मात्र शिष्यवृत्ती का मिळत नाही? याचे उत्तर मात्र माध्यमिक विभागाकडे नाही. आठवीतल्या विद्यार्थ्यांना बारावीपर्यंतच्या शिक्षणाला आर्थिक मदत प्रतिमाह ५०० रुपये देण्याची तरतूद आहे. मात्र पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा ठरवूनच पाल्याला शिष्यवृत्ती परिक्षेला बसू दिले जाते. एन.एम.एम.एस. असे या परिक्षेचे नाव असून अधिक जोमाने अभ्यास करुन गरीब विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जातात. संस्थाही त्यांना प्रवत्त करतात. मात्र ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमाच होत नसल्याने जिल्ह्यातील पालकांनी शिक्षण विभागाकडे संपर्क साधला असता याबाबतची माहिती पुन्हा नव्याने जमा करण्यात येत आहे. रेकॉर्ड हरवले आहे. बँकेत आधारकार्ड लिंक करा अशा सूचना गेले वर्षभर येत आहेत. संबंधित विविध प्रशालेत जावून चौकशी करता याबाबत जिल्हा शालेय शिक्षण विभागाने वेगवेगळ्या पद्धतीने चार वेळा रेकॉर्ड घेतले आहे. आम्ही केवळ त्यांच्या आदेशाने परिपत्रकनिहाय काम करतो असे सांगण्यात आले. या गोंधळात पालक व विद्यार्थ्यांनी शासनाच्या धोरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)