शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय न बांधताच पैसे खर्ची

By admin | Updated: February 5, 2016 23:40 IST

खेड तालुका : शिरवली ग्रामपंचायतीचा अजब प्रकार; ग्रामस्थांकडून कारभार वेशीवर

खेड : तालुक्यातील शिरवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या कारभाराची लक्तरे ग्रामस्थांनीच वेशीवर टांगल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. शौचालय न बांधताच पैसे खर्ची पडल्याचा प्रकार माहितीच्या अधिकाराखाली उघड झाला आहे.शिरवली ग्रामपंचायत ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीअंतर्गत निळवणे हे गाव आहे़ या गावातील कातळवाडीमधील ग्रामस्थांकरिता ग्रामपंचायतीने बांधलेले शौचालय अस्तित्वात नसल्याचे समोर आले आहे. माहितीच्या अधिकारात ही बाब उघड झाली असून, या प्रकाराने खेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. शौचालयाच्या निधीत केलेल्या घोटाळ्याप्रकरणी दोषी असणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे़शिरवली ग्रामपंचायतीअंतर्गत निळवणे (कातळवाडी) येथील ग्रामस्थांकरिता बांधण्यात आलेले हे सार्वजनिक शौचालय सध्या अस्तित्वात नाही. मात्र, या शौचालयासाठी ३५ हजार ९८३ रूपये खर्च करण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. गेले अनेक दिवस या शौचालयाबाबत येथील ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. खेड तालुक्यातील निळवणे (कातळवाडी) येथे सन २००७-०८ या आर्थिक वर्षात हे सार्वजनिक शौचालय मंजूर झाले होते. याकरिता ग्रामपंचायतीने ३५ हजार ९८३ रुपये खर्च देखील केले. मात्र, अद्याप या जागेवर शौचालय उभे राहिलेले नाही.याबाबत तत्कालीन सरपंच नारायण खांबक आणि सचिव विचारे यांच्याकडे माहिती घेतली असता समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या निळवणे (कातळवाडी) येथील गंगाराम निर्मळ, बाळकृष्ण पाडावे, प्रकाश राणीम, बाळकृष्ण राणीम, काशिराम डांगे, संतोष तांबिटकर, सुरेश निर्मळ आदी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे सार्वजनिक शौचालयाच्या अस्तित्वाबाबत १७ डिसेंबर २०१५ रोजी माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केला होता. त्यावर ग्रामपंचायतीने निळवणे (कातळवाडी) ग्रामस्थांना पत्र दिले आहे़ या पत्रात सार्वजनिक शौचालयासाठी सन २००७-०८मध्ये ३५ हजार ९८३ रूपये खर्च झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शौचालय न बांधता हे पैसे परस्पर वापरण्यात आले वा कसे याबाबत आता वरिष्ठांकडे दाद मागण्यात येणार आहे. शिरवली ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराबाबत आता कोणती कारवाई केली जाणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)वरिष्ठांकडे मागणार दाद : कारवाईकडे लक्षशौचालय न बांधता हे पैसे परस्पर वापरण्यात आले वा कसे याबाबत आता वरिष्ठांकडे दाद मागण्यात येणार आहे. शिरवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या या भोंगळ कारभाराची लक्तरे अशी वेशीवर टांगण्यात आल्याने आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी देशभ्रतार यावर काय कारवाई करतात? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. माहितीचा अधिकारमाहितीच्या अधिकारात उघड झालेली ही माहिती धक्कादायक आहे. गावातील काही ग्रामस्थांनीच हा प्रकार उघडकीला आणला आहे.