गुहागर : गुहागर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांच्यासह ९ पोलिसांची अन्यत्र बदली झाली आहे तर नऊ पोलीस गुहागरमध्ये नव्याने रुजू झाले आहेत. पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांची बदली रत्नागिरी येथील जिल्हा नियंत्रण कक्षात झाली आहे तर गुहागर पोलीस स्थानकाचा कारभार पोलीस निरीक्षक बी. के. जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे.
अरविंद बोडके दीर्घकाळ रजेवर असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काही दिवस उपनिरीक्षक साळुंखे यांनी काम पाहिले हाेते. साळुंके यांचीही बदली रत्नागिरी येथे झाली आहे तर बी. के. जाधव यांच्याकडे गुहागर पोलीस स्थानकाचे नेतृत्व देण्यात आले आहे. बी. के. जाधव हे पोलीस दलामध्ये येण्यापूर्वी चार वर्षे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करत होते. त्याचवेळी त्यांनी महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाची परीक्षा दिली आणि ते पोलीस दलात सहभागी झाले.
पोलीस स्थानकात शांत, संयमी स्वभावाने परिचित असलेले संतोष साळसकर यांची बदली राजापूर पोलीस स्थानकात, संतोष माने यांची चिपळूण, भालचंद्र मयेकर यांची जयगड, ईश्वरी सावंत यांची चिपळूण वाहतूक शाखेत तर चालक नारकर यांची सावर्डे पोलीस स्थानकात बदली झाली आहे. पोलीस नाईक राजू कांबळे यांची एकमेव जिल्हा बदली कोल्हापूर येथे झाली आहे.