शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

नीलेश राणेंचा जामीन फेटाळला

By admin | Updated: May 10, 2016 02:25 IST

उच्च न्यायालयाचा पर्याय : उर्वरित चौघांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

रत्नागिरी : काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत मारहाणप्रकरणी माजी खासदार नीलेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी खेड येथील जिल्हा अतिरिक्त व सत्र न्यायालयाने फेटाळला. आता उच्च न्यायालयात अपील किंवा अटक, असे दोन पर्याय राणे यांच्यासमोर आहेत.मराठा मेळाव्याला आपण उपस्थित राहिलो नाही म्हणून नीलेश राणे आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांनी केला होता. आपल्याला मारत मारत मुंबईपर्यंत नेण्यात आले आणि तेथेही आपल्याला मारहाण करण्यात आली, असे त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले होते. त्यानुसार नीलेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणी नीलेश राणे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने राणे यांना अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यावरील सुनावणी ३ मे रोजी खेड येथे जिल्हा अतिरिक्त व सत्र न्यायालयात झाली होती. त्या दिवशी सादर झालेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने अंतिम सुनावणी सोमवारी (दि. ९) घेण्याचे आदेश दिले होते.सोमवारी न्यायालयात या अर्जावर न्यायाधीश शेळके यांच्यासमोर सुनावणी झाली. सायंकाळी उशिरापर्यंत ही सुनावणी सुरू होती. सरकार पक्षातर्फे विनय गांधी यांनी काम पाहिले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. (प्रतिनिधी)काय होऊ शकते?अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने नीलेश राणे यांना अटक करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला आहे. आता पोलिस त्यांना अटक करू शकतात. कारवाई करण्याच्या दृष्टीने पोलिस यंत्रणा सज्ज असल्याचे चिपळूणच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. अर्थात अटक होण्याआधी नीलेश राणे यांना उच्च न्यायालयात अपील करण्याचा मार्ग मोकळा आहे, अशी माहिती एका ज्येष्ठ वकिलांनी दिली.चौघांना न्यायालयीन कोठडीअडरे : संदीप सावंत मारहाणप्रकरणी अटकेत असलेल्या अन्य चारही आरोपींना सोमवारी चिपळूण न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या मारहाण प्रकरणात सहभागी असलेले संशयित आरोपी तुषार पांचाळ, कुलदीप खानविलकर, मनीष सिंग, अण्णा ऊर्फ जयकुमार पिल्लई यांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. सोमवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्याने चारही आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर केले असता १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर करीत आहेत.