शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यातून शिवसेना हद्दपार करणार : निलेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 17:44 IST

शिवरायासमोर आपण सर्वांनी शपथ घेतली पाहिजे, काही झालं तरी शिवसेना नको, कोणीही चालेल, मात्र शिवसेनेचा उमेदवार इथे टिकता कामा नये. जिल्ह्यातून शिवसेनेला हद्दपार करणारच, असे मत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देआगामी लोकसभा निवडणुकीत विनायक राऊतांना घरी पाठवणार रत्नागिरीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सभासद नोंदणीचा शुभारंभ

रत्नागिरी : मागील काही घडामोडीमध्ये एकटा नीलेश राणे विरूद्ध अख्खी शिवसेना असे चित्र होते. मात्र, शिवसेना माझे काहीही करू शकले नाही. इतिहासामध्ये कधीही रत्नागिरीची शाखा चार दिवस बंद नव्हती, ती आपण बंद पाडली. आगामी लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांना घरी पाठवणारच, अशी शपथ आपण घेतली आहे.

शिवरायासमोर आपण सर्वांनी शपथ घेतली पाहिजे, काही झालं तरी शिवसेना नको, कोणीही चालेल, मात्र शिवसेनेचा उमेदवार इथे टिकता कामा नये. जिल्ह्यातून शिवसेनेला हद्दपार करणारच, असे मत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांनी व्यक्त केले.दक्षिण रत्नागिरीतील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सभासद नोंदणीचा शुभारंभ पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांच्याहस्ते शनिवारी रत्नागिरीत करण्यात आला.

यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला. या कार्यक्रमाला दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मेघना शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन माजळकर, जिल्हा सरचिटणीस मुन्ना खामकर, प्रवक्ते नित्यानंद दळवी, शहर अध्यक्ष अशोक वाडेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

निलेश राणे म्हणाले की, आपण आता काँग्रेस पक्षात नाही. या पक्षात आपण सर्वच गार झाला होतो. गंज धरली होती. आता संधी दिली मिळाली आहे, पक्षाची वेगळी ओळख निर्माण झाली. प्रत्येक बुथवर आपली लोक राहिली पाहिजेत. निवडणूक ही वेगळे रसायन आहे. प्रत्येक घरामागे कार्यकर्ते ठेवले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की, आज शिवसेनेत ज्याच्याकडे पैसा आहे तो सरस ठरत आहे. जुन्या शिवसैनिकांना काही दिले जात नाही. उदय सामंत शिवसैनिक झाले. पैशाच्या जीवावर पदे मिळवायची. अशाने जिल्हा पुढे कसा जाणार. राजन साळवी जुना शिवसैनिक. मात्र, त्याला काहीच नाही. जुन्या शिवसैनिकांमध्ये वेगळी रग आहे. ते दिसले की, त्यांना भेटावेसे वाटते, असे ते म्हणाले.

उदय सामंत यांच्यावर हल्लाबोलशिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलयं की, बाईमाणसाची अब्रु म्हणजे आपल्या आईसारखी असते. ती कोणीही असली तरी आपल्या आई-बहीण समान असते. आणि तुमची रासलिला सुरू आहे. अस नाही सोडणार. प्रत्येक प्रकरण बाहेर काढणार. निलेश राणेकडे आयुष्यातील हे सहा महिने आहेत, या सहा महिन्यात या सर्वांना सळो की पळो करून सोडल्याशिवाय गप्प बसणार नाही. अब्रुनुकसानीचा दावा ठोक नीलेश राणेवर असा हल्लाबोल त्यांनी म्हाडा अध्यक्ष आणि शिवसेना नेते उदय सामंत यांच्यावर केला.

भास्कर जाधवही निशाण्यावरशरद पवारासारख्या ७५ वषार्तील माणूस सहा दिवसात बरा होतो. भास्कर जाधव बराच होत नाही. तीन महिने झाले, प्रत्येकाला दाखवतोय बघा माझा पाय. स्वत:च राजकीय कौतुक किती करून घ्यायचं. ज्या बाळासाहेबांच्या विरोधात भास्कर जाधव बोलले त्यांचेच पाय धरण्यासाठी विनायक राऊत त्याठिकाणी जातो. हे केवळ राणे नकोच यासाठीच असल्याचे निलेश राणे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे Ratnagiriरत्नागिरीPoliticsराजकारण