प्रशांत सुर्वे - मंडणगड--साठ वर्षे ग्रामपंचायत असणारे मंडणगड नगरपंचायत होत असताना त्याची प्रभाग रचना करताना शासनाने जुने प्रगणक गट कायम ठेऊन नवीन वाढत्या लोकवस्तीनुसार प्रभाग रचना केली आहे़ मंडणगड शहरामध्ये बोरीचामाळ, साईनगर, शिवाजीनगर, आदर्शनगर, केशवशेठ लेंडे नगर अशी नवी लोकवस्ती उदयास आल्याने शहराचा विकास झाला असला तरी ही लोकवस्ती कोणत्याही शहर विकासाच्या आराखड्याप्रमाणे नसल्याने शहर नियोजनशून्य पध्दतीने वाढले आहे. यामुळे काही प्रभागात दोनशेहून अधिक तर काही प्रभागात ऐंशीही मतदार नाहीत. मंडणगड नगर पंचायतीचे प्रामुख्याने १७ प्रभाग पाडण्यात आले आहेत. त्यामुळे नगरपंचायतीवर १७ नगरसेवक व निवडून येणारे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष अशी पदे अस्तित्वात येणार आहेत.मंडणगड नगरपंचायतीची प्रभाग रचना, त्यातील मतदार व त्यांचे आरक्षण पुढीलप्रमाणे असेल - प्रभाग क्रमांक १ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - एकूण मतदार - १८७ पुरूष ४८, स्त्री ३९, प्रभाग क्रमांक २ सर्वसाधारण महिला एकूण मतदार १०३, पुरूष ५२, स्त्री ५१, प्रभाग क्रमांक ३ सर्वसाधारण प्रवर्ग एकूण मतदार ११८, पुरूष ५९, स्त्री ५९, प्रभाग क्रमांक ४ सर्वसाधारण प्रवर्ग एकूण मतदार १८५ पुरूष ९१, स्त्री ९४, प्रभाग क्रमांक ५ सर्वसाधारण महिला एकूण मतदार १६०, पुरूष ७८, स्त्री ८२, प्रभाग क्रमांक ६ नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला एकूण मतदार १८७ -पुरूष ९७, स्त्री ९० प्रभाग क्रमांक ७ सर्वसाधारण एकूण मतदार २२८- पुरूष १३५, स्त्री ९३, प्रभाग क्रमांक ८ - सर्वसाधारण एकूण मतदार १४२, पुरूष ६७, स्त्री ७५.प्रभाग क्रमांक ९ सर्वसाधारण महिला एकूण मतदार १४७- पुरूष ७४, स्त्री ७३, प्रभाग क्रमांक १०- सर्वसाधारण महिला एकूण मतदार २१९ - पुरूष ११०, स्त्री १०९, प्रभाग क्रमांक ११ अनुसूचीत जाती खुला, एकूण मतदार - ७८ पुरूष ४०, स्त्री ३८, प्रभाग क्रमांक १२ नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री एकूण मतदार १०० - पुरूष ५०, स्त्री ५०, प्रभाग क्रमांक १३, नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला -एकूण मतदार १३३ - पुरूष ६३, स्त्री ७०, प्रभाग क्रमांक १४ सर्वसाधारण प्रवर्ग एकूण मतदार-१०६ पुरूष ५३, स्त्री ५३, प्रभाग क्रमांक १५ सर्वसाधारण महिला एकूण मतदार १०३ - पुरूष ५४, स्त्री ४९, प्रभाग क्रमांक १६ सर्वसाधारण महिला एकूण मतदार ९७ - पुरूष ४७, स्त्री ५०, प्रभाग क्रमांक १७ - नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री एकूण मतदार १६० - पुरूष ७१, स्त्री ८९. अशाप्रकारे नगरपंचायतीचे प्रभाग असून, मतदार १ नोव्हेंबर रोजी मतदान करून नगरसेवक निवडून देणार आहेत.निवडणूक : जोरदार तयारी सुरुमंडणगड ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाल्यानंतर होणारी ही पहिली निवडणूक आहे. त्यामुळे साऱ्यांनाच या निवडणुकीबाबत उत्सुकता आहे. निवडणूक जवळ येत असल्याने प्रशासकीय यंत्रणेचीही धावपळ उडाली आहे. या पहिल्याच निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झाली आहे.कमी लोकसंख्यामंडणगड नगरपंचायतीसाठी जी प्रभागरचना करण्यात आली आहे, त्यामध्ये ७०पेक्षाही कमी मतदारसंख्या असलेले प्रभाग आहेत.
नवीन वस्तीनुसार प्रभाग
By admin | Updated: October 12, 2015 00:34 IST