शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गावरचा नवीन उड्डाणपुल लॉंचरच्या यंत्रणेसह कोसळला, चिपळुणात खळबळ

By संदीप बांद्रे | Updated: October 16, 2023 15:14 IST

मुंबई-गोवा महामार्ग बंद, मुंबईच्या टीमला पाचारण, राष्ट्रीय महामार्ग विभागाची धावाधाव

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर शहरातील बहादूरशेख नाका येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे गर्डर सोमवारी सकाळी ८ वाजता मधोमध खचल्याचा प्रकार घडला होता. मात्र दुपारी २.४५ वाजता हा पूल लॉंचरच्या यंत्रणेसह अचानक कोसळला. मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांची पळापळ झाली. या घटनेने चिपळुणात खळबळ उडाली असून घटनास्थळी प्रशासकीय यंत्रणेसह नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. नागरिक करत गर्डरमधील स्टीलसह काँक्रीट देखील तुटले. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग विभागाचीही धावाधाव झाली मुंबईतील अभियंता टीमला पाचारण केले आहे.मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण बहादूरशेख नका ते प्रांत कार्यालय पर्यंत उड्डाणपूल होत आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणातील हा सर्वात मोठा उड्डाणपूल असून सुमारे १.८१ की.मी.इतकी या पुलाची लांबी आहे. तर ४६ पिलर त्यासाठी उभारण्यात आले आहेत. या पुलाच्या पिलरचे काम पूर्ण झाल्या नंतर शहरातील बहादूरशेख येथून पिलरवर गर्डर चढवण्याचे काम सुरू होते. मात्र नव्याने चढविलेले गर्डर सोमवारी सकाळी ८ वाजता काम सुरू असतानाच खचले. यावेळी मोठा आवाज झाला झाला. या घटनेमुळे आधीच चिपळूणकर धास्तावले असताना सोमवारी दुपारी २.४५ वाजता गर्डर उभारण्यासाठी वरती ठेवलेल्या लॉंचरसह नवीन पूल कोसळला. या घटनेवेळी मोठा आवाज झाला आणि  जणू परिसरातील नागरिकांच्या पायाखालची जमीनच सरकली. बहाद्दूर शेख नाक्यावर एकच धावपळ उडाली. वाहन चालकांसह नागरिकांनी देखील अक्षरशः धूम ठोकली. या घटनेची माहिती मिळताच आमदार शेखर निकम यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच बहाद्दूर शेख नाक्यावर प्रशासकीय यंत्रणा दाखल झाली असून नागरिकांनीही मोठी गर्दी केली आहे.या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला असून दोन्ही बाजूनी वाहनांची रांग लागली आहे. त्यामुळे जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करून हळूहळू वाहने सोडली जात आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्ग