शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

बसवर झळकणार गावांचे नवे फलक

By admin | Updated: August 22, 2014 00:51 IST

एस. टी. महामंडळ : अस्पष्ट नामफलक होणार दूर

अडरे : चिपळूण एस. टी. आगारातील बसमध्ये लावण्यात येणारे नावाचे फलक जीर्ण झाले आहेत. ते बदलून आता नव्याने ६०० नामफलक तयार करण्याचे काम सध्या सुरु असून, गणेशोत्सवाच्या काळात हे नवीन फलक झळकणार आहेत. चिपळूण एस. टी. आगारातून धावणाऱ्या एस. टी. बसला लावण्यात येणारे गावाच्या नावांचे नामफलक खराब झाले होते. अनेक वर्षांपासून हे नामफलक बदलून नवीन फलक तयार करण्याची मागणी होत होती. याची दखल घेत चिपळूण आगाराने आता ६०० नवीन फलक बनविण्याचे काम हाती घेतले आहे. लवकरच हे फलक लावण्यात येणार आहेत. चिपळूण आगारातून ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्यांना लावण्यात येणारे फलक स्पष्ट दिसत नव्हते. यामुळे प्रवाशांना गाडीचे नाव समजत नव्हते. यामुळे चालक व वाहकांना अनेक वेळा प्रवाशांच्या रोशाला सामोरे जावे लागायचे. त्यांना प्रवाशांचे बोल ऐकावे लागायचे. गाडी कोणती आहे, याचे उत्तर देताना बसमधील प्रवासीही अनेकवेळा हैराण होत होते. याबाबत चालक, वाहक व प्रवाशांच्याही तक्रारी आगार व्यवस्थापक एस. बी. सय्यद यांच्याकडे वारंवार येत होत्या. याची दखल घेऊन सय्यद यांनी नवीन फलक तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे फलक लागल्यानंतर प्रवाशांना एस. टी. कोणत्या गावाकडे मार्गस्थ होणार आहे, याची माहिती मिळणार आहे. यामुळे प्रवासी भारमानात वाढ होणार आहे. सध्या प्रवासी वाढवा अभियान सुरु आहे. तसेच एस. टी.मध्ये विविध योजना राबवण्यामध्ये काही प्रमाणात तत्कालिन आगारप्रमुख सोहनी यशस्वी झाले होते. यानंतर नूतन आगारप्रमुख एस. बी. सय्यद यांनीही धोरणात्मक निर्णय घेऊन एस. टी. प्रशासनामध्ये शिस्त, चालक वाहकांमध्ये समन्वय आणण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच नवीन एस. टी. बसेस सुरु केल्या. अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच गाड्यांच्या नावांचा फलक बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. (वार्ताहर)