रत्नागिरी : गडचिरोलीसारख्या आदिवासी, नक्षलग्रस्त भागात आठ वर्ष काम करण्याचा अनुभव, विविध विभागांमधील कामाचा अनुभव असल्याने या अनुभवाचा उपयोग रत्नागिरीचा विकास करण्यासाठी मिळाला तर आनंदच वाटेल, असे उद्गार रत्नागिरीचे नवनियुक्त निवासी उपजिल्हाधिकारी सारंग कोडोलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना काढले. आधीचे निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांची काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर येथे बदली झाली आहे. त्यांच्या रिक्तपदी सारंग कोडोलकर यांची नियुक्ती झाली आहे. आज (गुरूवारी) त्यांनी आपला कार्यभार स्वीकारला. या जिल्ह्यात पर्यटन, औद्योगिक क्षेत्रात विकासासाठी अधिक काम करता येऊ शकते. मी काही काळ विधानमंडळातही काम केले असल्याने त्याचा उपयोगही उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यभार स्वीकारल्यानंतर कोडोलकर यांनी सर्व शाखाप्रमुखांची बैठक घेऊन माहिती घेतली. (प्रतिनिधी)
नक्षली भागातील कामाचा अनुभव गाठीशी : कोडोलकर
By admin | Updated: November 27, 2015 00:07 IST