शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

बांदरी विभागाला नवसंजीवनी?

By admin | Updated: January 15, 2016 00:47 IST

मुख्यमंत्र्यांची उपस्थिती : महाळुंगे येथे जलोपासना अभियान

खेड : अठरा गाव बांदरी विभागातील महाळुंगे गावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १७ जानेवारीला भेट देणार आहेत. येथील जगबुडी नदीच्या पाण्यावर जलोपासना अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. खेड येथील एमबीए महाविद्यालयाचे प्राध्यापक सतीश कदम यांच्या स्वत:च्या मालकीच्या ६ एकर जागेत उभारण्यात आलेल्या फार्म हाऊसमध्ये ग्रामीण पर्यटन सुरू करण्याच्या कामालाही त्यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात येणार आहे.खेड तालुक्यातील डोंगराळ भाग असलेल्या महाळुंगेसारख्या गावात बहुउद्देशीय योजनांचा प्रथमच प्रारंभ मुख्यमंत्री यांच्याहस्ते होत आहे. हा मार्ग असलेल्या अठरा गाव धवडे बांदरी विभागातील ४० गावांतील पर्यटन आणि कृषी विकासाला यामुळे नवसंजीवनी मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा त्यामुळे महत्त्वपूर्ण मानला जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस १७ जानेवारीला सकाळी ९.३० वाजता महाळुंगे येथे उपस्थित राहणार आहेत. गावातील केदारनाथ मंदिराजवळ यावेळी खास जलचेतना परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. जगबुडी नदीच्या पाण्यावर जलोपासना अभियानासह आंबवली महाळुंगे ग्रामीण पर्यटन कार्याला त्यांच्याहस्ते प्रारंभ करण्यात येणार आहे. कोकण भूमी प्रतिष्ठानच्या वतीने या कोकण जलपरिक्रमेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी दिली.जलपरिक्रमा आणि जलचेतना परिषदेमुळे येथील अठरा गाव बांदरी विभागासह तालुक्यातील कृषी आणि पर्यटन क्षेत्रही विकसित होणार आहे. या भागातील डोंगराळ भागात असलेल्या धनगरवाड्यांसह डोंगरातील अनेक गावांना वारंवार भासणारी पाणीटंचाई तसेच नदीकिनारी पारंपरिक पध्दतीने करीत असलेल्या शेतीमध्ये बदल करण्याच्या उद्देशाने या जलचेतना परिषदेचा आणि जलपरिक्रमा योजनेचा चांगला लाभ मिळणार आहे. तसेच त्यामुळे रोजगारासह सामाजिक आणि शैक्षणिक विकासाला हातभार लागणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री अनंत गीते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यासह पालकमंत्री रवींद्र वायकर, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, भटक्या विमुक्त जमाती राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते आणि प्रमुख मार्गदर्शक राजेंद्रसिंह आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. (प्रतिनिधी)पर्यटनाची माहिती : १९९५ नंतर मुख्यमंत्री ग्रामीण भागात१९९५मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी तालुक्यातील महत्त्वाच्या कामांसाठी भेटी दिल्या होत्या़ त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १९९५नंतर तालुक्यातील ग्रामीण भागाला भेट देणारे पहिले मुख्यमंत्री आहेत. ग्रामीण भागाच्या पर्यटन विभागाची माहिती यानिमित्त घराघरात पोहोचणार आहे़ पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. मोठ्या प्रमाणावर राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. अशातच कोकण हा जलसमृध्द भाग आहे. तरीही कोकणात भीषण पाणीटंचाई जाणवते. याच पार्श्वभूमीवर पाण्याचे नियोजन केल्यास कोकणातील गावागावामध्ये जलसमृध्दी येऊ शकते.