रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या नवनिर्माण ज्युनिअर कॉलेजतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय ऑनलाइन स्कॉलर सर्च परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेची प्राथमिक फेरी ४ एप्रिल रोजी तर अंतिम फेरी ११ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. ३० मार्चपर्यंत विद्यार्थ्यांनी नावे नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संगमेश्वर, राजापूर, लांजा आणि रत्नागिरी या ४ तालुका मर्यादित जिल्हास्तरीय परीक्षा घेण्यात येते. शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची माहिती मिळावी, या उद्देशाने ही स्पर्धा घेतली जाते. यावर्षी ऑनलाइन गुगल फॉर्मद्वारे ही परीक्षा घेण्यात येणार आहे. गणित, विज्ञान, इतिहास, नागरिकशास्त्र, इंग्रजी आदी महत्त्वाच्या विषयांवर ५० गुणांची वस्तुनिष्ठ स्वरूपात ही परीक्षा होणार आहे.
प्रत्येक शाळेतून प्राथमिक फेरीतील पहिल्या ३ क्रमांकांना बक्षीस दिले जाणार आहेत. ही परीक्षा एक तासाची असून, सकाळी ९ ते १२ या वेळेत विद्यार्थ्यांना घरबसल्या परीक्षा देता येणार आहे. या परीक्षेला प्रवेश मोफत असून, दहावीच्या विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करून सहभाग घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. वामन सावंत यांनी केले आहे.