शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

नाटे पोलीस ठाण्याचे आता ई-बीट पेट्रोलिंग

By admin | Updated: October 25, 2015 23:32 IST

जिल्ह्यात पहिलाच उपक्रम : पोलीस यंत्रणेवर जिल्हास्तरावरून नजर

सचिन नारकर- जैतापूर -सागरी ग्रामीण पोलीस ठाणे, नाटेच्याअंतर्गत येणाऱ्या प्रमुख गावांमध्ये ‘इलेक्ट्रॉनिक्स डिवाईस’ बसवण्यात आले आहेत. दहशतवादी, अतिरेकी, अनोळखी व्यक्ती यांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन शासनाने ‘ई बीट पेट्रोलिंग’ ही संकल्पना अमलात आणली आहे. त्याचा पहिला प्रयोग रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी सागरी ग्रामीण पोलीस ठाण्याकरिता केला आहे.पोलीस कर्मचारी त्या - त्या गावात ठरल्याप्रमाणे पेट्रोलिंग करतात की नाही, हे या डिवाईसमुळे कळणार आहे. डिवाईसच्या भीतीने का होईना, प्रत्येक गावात पोलीस कर्मचारी आपल्या वाहनासह जात असल्याने त्या गावात पोलीस येणार म्हणून सर्व काही सुरळीत होत आहे. नाटे पोलीस ठाण्याचे कर्मचारी आपली सेवा व्यवस्थित बजावत आहेत.ई - डिवाईस कशेळी, वेत्ये, साखरीनाटे, मुसाकाझी, आंबोळगड, धाऊलवल्ली तर बंदर जैतापूर, माडबन, तुळसुंदे, धानिवरे, अणसुरे, कात्रादेवी, सागवे, काताळी या भागात बसवण्यात आले आहेत. या ठिकाणी दिवसातून दोनवेळा पेट्रोलिंग केले जाते. याची पूर्ण नोंद संगणकावर झाल्यावर त्याची माहिती जिल्हास्तरावर कळविण्यात येते.नाटे, साखरीनाटे भागामध्ये डिवाईस बसवताना नाटे पोलिसांना ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला होता. अणुऊर्जेसंदर्भात काहीतरी यंत्र बसवत असल्याचा ग्रामस्थांचा समज झाल्याने ग्रामस्थांनी इतरत्र कुठेही हे यंत्र बसवता कामा नये, अशी भूमिका घेतली. या डिवाईसबाबत नाटे पोलिसांनी डेमोसुद्धा दाखवला होता. तरीदेखील विरोध झाल्याने अखेर ग्रामपंचायतीच्या भिंतीवर तबकडीसारखा गोल असणारे हे डिवाईस बसविण्यात आले.डिवाईस २ इंच व्यासाचे, काळ्या रंगाचे इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटिक पाच सेंटीमीटर जाडीचे आहे. ते एका स्क्रूद्वारे भिंतीवर पाच फूट उंचीवर बसवण्यात आले असून, त्याच्याशी संबंधित असणारे दुसरे यंत्र टी. व्ही. रिमोटप्रमाणे आहे. त्याच्या मागच्या बाजूला सेन्सर आहे. या डिवाईसच्या समोर नेले असता तो डिटेक्टर आपले काम सुरु करतो व त्याप्रमाणे तारीख, वेळ याची नोंद होते. ही नोंद संगणकात होऊन मग थेट जिल्हास्तरावर पाठवण्यात येते.४कशेळी, वेत्ये, साखरीनाटे, मुसाकाझी, आंबोळगड, धाऊलवल्ली तर बंदर जैतापूर, माडबन, तुळसुंदे, धानिवरे, अणसुरे, कात्रादेवी, सागवे, काताळी या भागात ई-डिवाईस.४दिवसातून दोनवेळा होते पेट्रोलिंग.४डिवाईसला ग्रामस्थांनी सुरुवातीला केला विरोध.४डिवाईसवरील नोंद जिल्हास्तरावर पाठवण्यात येते.४पोलीस अधीक्षकांचा उपक्रम.