शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

- दापोली तालुक्यात लोकसहभागातून नळपाणी योजना

By admin | Updated: March 7, 2017 17:14 IST

आंजर्ले ग्रामस्थांचा पुढाकार, एकीचे बळ, पाणी योजनेचे फळ

- दापोली तालुक्यात लोकसहभागातून नळपाणी योजनाआंजर्ले ग्रामस्थांचा पुढाकार, एकीचे बळ, पाणी योजनेचे फळदापोली : गावची नळपाणी योजना नादुरूस्त झाली. दुरूस्तीला निधी मिळत नाही. म्हणून रडत बसण्यापेक्षा गावकऱ्यांनीच एकत्र येऊन तब्बल तीन लाख रूपये जमवले आहेत. लोकवर्गणी झाली, आता लोकसहभागातून नवीन नळपाणी योजनाच राबवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे... ही घटना आहे, दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील. गाव करील ते राव काय करील या म्हणीचा प्रत्यय देणारी.आंजर्ले ग्रामपंचायतीकरिता पाणीपुरवठा करण्यात येणारी नळपाणी योजना कुचकामी ठरल्यानंतर वारंवार पाठपुरावा करुनही नळपाणी योजनेच्या दुरुस्तीकरिता निधी मिळाला नाही. यावर तोडगा म्हणून ग्रामस्थांनी लोकसहभाग व लोकवर्गणीतून आंजर्ले - ताडाचा कोंड पिण्याच्या पाण्याची नवीन पर्यायी योजना ग्रामस्थांनी साकारण्याचे ठरविले आहे. याकरिता ३ लाख लोकवर्गणीसुद्धा जमा केली असल्याचे कृ षी तज्ज्ञ, प्रगतीशील शेतकरी राजेश जैन यांनी सांगितले.आंजर्ले ग्रामपंचायतीची सुकोंडी - वाघीवणे पाणी योजना कार्यान्वित आहे. मात्र निकृष्ट कामामुळे ही योजना वारंवार बंद पडत असून, ही नळपाणी योजना गेले दोन महिने बंद आहे. या नळपाणी योजनेला पर्यायी नळपाणी योजना म्हणून आंजर्ले खामतळे विहिरीतील पाणी ताडाचे कोंडावरील साठवण टाकीत टाकून गावाला पाणी पुरवठा करणे संदर्भात ग्रामस्थांचे एकमत झाले. शासकीय निधीची वाट न पाहता स्वेच्छेने लोकवर्गणी गोळा करुन नळपाणी योजना राबविण्याचा निर्णय झाला. या पाणीपुरवठ्याकरिता ३ लाख रुपयांची गरज होती. लोकवर्गणीतून ३ लाख रुपये गोळा झाले असून, ग्रामपंचायतीच्या जुन्या योजनेला पर्यायी नळपाणी योजना म्हणून आंजर्ले - ताडाचा कोंड लोकवर्गणीतून नळपाणी योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचे काम युद्ध पातळीवर सुरु असून लवकरच ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार आहे. (प्रतिनिधी)