शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची संरक्षण व्यवस्था अन् आर्थिक परिस्थिती मजबूत राहील; भेंडवळचं भाकीत
2
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मार्चला महायुतीची रॅली
3
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
4
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
5
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
6
उडाला भडका, निघाला धूर! अजित पवार गटाचे झिरवाळ, मविआच्या प्रचारसभेला
7
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
8
संपादकीय: विवेकाला बळ, पण...
9
भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर, पाऊस, पिकांबाबत केलं असं भाकित 
10
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
11
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...
12
बारामती: त्या रात्री बँकेत ४० ते ५० जण होते, डीसीसी बँक व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई 
13
डॉक्टर पत्नीला २ प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं; पतीनं बेदम मारलं
14
पंतप्रधानांशी कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस तयार, ‘इंडिया’ आघाडीचे वादळ येत आहे : राहुल गांधी
15
...‘ते’ तर बालबुद्धी; अजित पवारांवर टीका; शरद पवारांनी धुडकावला मोदींचा सल्ला
16
पवार, ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवार गटात यावे; पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला
17
केजरीवाल जामिनावर मुक्त, निवडणुकीच्या शेवटच्या चार टप्प्यांमध्ये करणार प्रचार
18
सेक्स स्कँडलमुळे या नेत्यांचेही करिअर झाले उद्ध्वस्त; राजभवनात नकाे ते कृत्य अन् द्यावा लागला राजीनामा
19
अंगठाबहाद्दर म्हणून सरणावर जाणार नसल्याचा आनंद; ठाणे जिल्ह्यात १३ हजार ७७ निरक्षर झाले साक्षरतेच्या परीक्षेत उत्तीर्ण
20
मोदी हिंदी पट्ट्यात लावणार जोर; महाराष्ट्र, प. बंगालवरही फोकस

नाणार प्रकल्प : उच्चस्तरीय समितीला पाय ठेवू देणार नाही : राजन साळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 3:17 PM

नाणार प्रकल्पाला विरोध असतानादेखील न जुमानता नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीला नाणार परिसरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा आमदार राजन साळवी यांनी राजापूर येथे दिला.

ठळक मुद्देनाणार प्रकल्प : उच्चस्तरीय समितीला पाय ठेवू देणार नाही : राजन साळवीशिवसेनेचा जोरदार विरोध कायम

राजापूर : नाणार प्रकल्पाला शंभर टक्के विरोध असतानादेखील त्याला न जुमानता शासनाने प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचा विचार करण्यासाठी नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीला शिवसेनेचा जोरदार विरोध असून खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या समितीला नाणार परिसरात पाय ठेवू देणार नाही, असा सज्जड इशारा आमदार राजन साळवी यांनी राजापूर येथे दिला.नाणार प्रकल्पाला परिसरातील जनतेचा शंभर टक्के विरोध असतानाच शासनाने मात्र तो प्रकल्प रेटण्याची भूमिका कायम ठेवली आहे मागील दोन वर्षात अनेक आंदोलने उभारुन स्थानिक जनतेने आपला विरोध सातत्याने दाखवुन दिला आहे पण शासन मात्र आपल्या भुमिकेवर ठाम राहिले आहे.

रिफायनरी प्रकल्पाला मोठा विरोध असतानासुध्दा आता विद्यमान राज्य शासनाने रिफायनरीच्या समस्यांचा विचार करण्यासाठी माजी अधिकारी एम. डी. सुकथनकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची उच्चस्तरीय स्वतंत्र समिती नियुक्त केली आहे. शिवसेनेनेचा त्या समितीला प्रखर विरोध असुन त्या समितीला नाणार परिसरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा आमदार राजन साळवी यांनी दिला.शिवसेनेने सुरवातीपासूनच रिफायनरीला जोरदार विरोध केला आहे. स्थानिक जनतेच्या आम्ही ठामपणे पाठीशी असुन जोवर शासन हा प्रकल्प रद्द करण्याची भूमिका घेत नाही, तोवर शिवसेनेचा लढा कायम राहिल असे त्यान्नी पुढे सांगितले नियोजीत रिफायनरी प्रकल्पाला तर मोठा विरोध आहे.

त्या विरोधाची पत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आली होती तर मुख्यमंत्र्यांनी प्रकल्प परिसराचा दौरा करावा व तेथील वस्तुस्थिती पाहून निर्णय घ्यावा, असे आवाहनदेखील यापुर्वी खासदार विनायक राऊत यांनी केले होते.मुख्यमंत्र्यांसह राज्य शासनाने कुणालाच न जुमानता रिफायनरी प्रकल्प मार्गी लावण्याचे धोरण अवलंबले असून अशी समिती नियुक्त करणे हा प्रकल्पग्रस्त जनतेचा घोर अपमान आहे, असे राजन साळवी यांनी सांगितले.

शिवसेनेच्या खासदार, आमदारांना प्रकल्प परिसरात फिरु देणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेचादेखील आमदार साळवी यांनी चांगलाच समाचार घेतला.मागील अनेक वर्षे सागवे विभाग हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. तेथील जनता यापुढेदेखील शिवसेनेबरोबर राहिल. त्यामुळे आमच्या बालेकिल्ल्यात जर कुणी आम्हाला आव्हान देत असेल तर आम्हीदेखील तयार आहोत. या विभागात आम्ही केव्हाही फिरायला तयार असून आम्हाला अडवुन दाखवा व पुढे घडणाऱ्या परिणामांना तोंड द्यायला तयार रहा, अशा शब्दात त्यांनी ठणकावून सांगितले.या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे राजापुर तालुका संपर्कप्रमुख दिनेश जैतापकर, तालुका प्रमुख प्रकाश कुवळेकर, उपतालुकाप्रमुख विश्वनाथ लाड, राजन कुवळेकर, माजी सभापती सुभाष गुरव, शहरप्रमुख संजय पवार, युवा सेना तालुकाधिकारी प्रफुल्ल लांजेकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरीRajan Salviराजन साळवीShiv Senaशिवसेना