शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील अतिवृष्टीचा कोकण रेल्वेला फटका, चार गाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 12:23 IST

मुंबईत सोमवारी रात्री पावसाने कहर केला आणि पुढील २४ तास कोकण रेल्वेची वाट बिकट करून टाकली. मंगळवारी दुपारपर्यंत कोकण रेल्वेची धाव पनवेलपर्यतच होती. कोकण रेल्वे मार्गावरील ४ महत्वाच्या गाड्या मंगळवारी रद्द करण्यात आल्या.

ठळक मुद्देमुंबईतील अतिवृष्टीचा कोकण रेल्वेला फटका, चार गाड्या रद्दजनशताब्दी, तेजस एक्सप्रेस रद्द; तुतारी १४ तास उशिरा

रत्नागिरी : मुंबईत सोमवारी रात्री पावसाने कहर केला आणि पुढील २४ तास कोकण रेल्वेची वाट बिकट करून टाकली. मंगळवारी दुपारपर्यंत कोकण रेल्वेची धाव पनवेलपर्यतच होती. कोकण रेल्वे मार्गावरील ४ महत्वाच्या गाड्या मंगळवारी रद्द करण्यात आल्या.

जनशताब्दी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-कोचुवेली एक्सप्रेस व दादर-रत्नागिरी-दादर पॅसेंजर या गाड्यांचा त्यामध्ये समावेश आहे. बुधवारच्या मुंबईतून सुटणाऱ्या तेजस व जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. मंगळवारी तुतारी एक्सप्रेस तब्बल १४ तास उशिराने धावत होती.१९७४ नंतर मुंबईत पावसाने कहर केला असून मुंबई शहर पावसाच्या पाण्यात असल्यासारखी स्थिती आहे. कोकण रेल्वेमार्गावर धावणाºया अनेक गाड्या या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर येथून सुटतात. मात्र मुंबई शहरात सोमवारी मध्यरात्रीपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबईत पाणीच पाणी झाले. लोकल रेल्वेसेवाही मंगळवारी दुपारपर्यंत कोलमडली. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाºया तीन गाड्या रद्द मंगळवारी रद्द करण्यात आल्या.मुंबईत कोकण रेल्वे मार्गावरील अन्य गाड्याही नेता येत नसल्याने त्या मंगळवारी दुपारपर्यंत पनवेलला थांबविल्या जात होत्या. दुपारनंतर या गाड्यांची वाहतूक मुंबईतून सुरू झाली. १ जुलैची रेल्वे क्र.१२६२० मंगलूरू-लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्सप्रेस पनवेलपर्र्यंतच धावली. १२६१९ क्रमांकाची मत्स्यगंधा एक्सप्रेस दुपारनंतर मंगलूरू येथे रवाना झाली. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या अनेक गाड्या मंगळवारी १ ते १४ तास उशिराने धावत होत्या.१६३३४ वेरावळ एक्सप्रेस पावणेदोन तास उशिराने धावत होती. १२४५० गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस तीन तास उशिराने धावत होती.१९४२४ हमसफर गाडी ६ तास, २२६५४ निझामुद्दीन त्रिवेंद्रम साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस ६ तास, ५०१०५ दिवा सावंतवाडी पॅसेंजर गाडी दीड तास उशिराने धावत होती.अतिवृष्टीने मुंबईकरांचे हाल बेहाल झालेले असतानाच कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी क्र.११००३ दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस मंगळवारी सायंकाळी ५ वाजता घेतलेल्या माहितीनुसार तब्बल १४ तास उशिराने धावत होती. ही गाडी त्यावेळी कोलाड येथून सावंतवाडीच्या दिशेने निघाली होती. या गाडीला उशिर झाल्याने ताटकळत बसलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.पावसामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळित झाल्याने व मुंबईत पाणी तुंबल्याने कोकण रेल्वेच्या सर्वच स्थानकांवर शुकशुकाट दिसून येत होता. एरव्ही गजबजलेल्या रत्नागिरी स्थानकातही शुकशुकाट होता. प्रवासात अडकायला नको म्हणून अनेकांनी उशिराने धावत असलेल्या गाड्यांनी जाणे टाळले. चार महत्वाच्या गाड्या रद्द झाल्याने सर्वच प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडले.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरी