शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

पावसाळ्यात मुंबई-गोवा महामार्ग रडवणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:00 PM

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गाचे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व खेडवगळता चौपदरीकरण काम संथ गतीने सुरू आहे. चिपळूण व ...

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गाचे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व खेडवगळता चौपदरीकरण काम संथ गतीने सुरू आहे. चिपळूण व खेडमध्येही जमिनीचा मोबदला न मिळाल्याने जमीनमालकांनी चौपदरीकरणाच्या कामाला विरोध केल्याने अनेक ठिकाणी काम बंद पडलेले आहे. निवडणुकीच्या काळात चौपदरीकरण कामाकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. अपूर्ण स्थितीत भराव ओढलेला असून, पावसाळ्यात ओढ्यांच्या येणाऱ्या पाण्याला वाव करून दिलेला नाही. त्यामुळे पाणी मुख्य रस्त्यावर येणार आहे. अनेक ठिकाणी पावसाळ्यात वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यात महामार्ग वाहनचालकांना रडविण्याची शक्यता व्यक्त होत आहे.जिल्ह्यातील खेड व चिपळूण विभागात काही भागवगळता वेगाने काम सुरू झाले. रत्नागिरी विभागातील आरवली ते वाकेड या दोन टप्प्यांमध्ये वर्षभर काम रखडले. आता रस्ता रुंद करण्याचे, कटिंग्ज काढण्याचे काम सुरू आहे. रुंदीकरणासाठी कापलेल्या डोंगराच्या कडांमुळे माती महामार्गावर आली आहे. ही माती रुंदीकरणासाठी पसरण्यात आली आहे. कटिंग्ज काढली असली तरी पावसाळ्यात माती फुगून दरडी रस्त्यावर कोसळण्याची भीती आहे.उपाययोजना आवश्यकमहामार्ग चौपदरीकरणाचे अपुरे काम, पसरलेली माती, महामार्गावर दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन पावसाळ्यात अपघात होऊ नयेत, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना चौपदरीकरणातील ठेकेदार तसेच महामार्ग विभागाने कराव्यात, अशी मागणी होत आहे.आरवली ते वाकेडपर्यंत केवळ १० टक्केचजिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते कांटे व बावनदी ते वाकेड (लांजा) या दोन टप्प्यांचे काम खूपच रेंगाळले आहे. जेमतेम १० टक्के काम झाले आहे. जिल्ह्यात अन्यत्र ५० टक्के काम झाले आहे. हे काम वेग कधी घेणार? असा सवाल आता करण्यात येत आहे. मात्र, रत्नागिरी विभागातील मंद कामामुळे या दोन टप्प्यांच्या मार्गावर अपघाताची शक्यता वाढली आहे. अनेक ठिकाणी डायव्हर्शन घेण्यात आली आहेत.जमीनमालकांचा इशारामहामार्ग प्रकल्पासाठी जमीनमालकांना आतापर्यंत खेडमध्ये ३५० कोटींचा मोबदला देण्यात आला आहे. मात्र, अद्याप १०० कोटींचा मोबदला देणे बाकी आहे. त्यामुळे ज्यांना मोबदला मिळाला नाही, त्यांनी आपल्या जमिनीमध्ये ठेकेदाराला काम करू देण्यास विरोध केला आहे. जमीन मालकांच्या विरोधामुळे भरणे, भोस्ते, लोटे, वेरळ भागात चौपदरीकरण काम रखडले आहे. मुसळधार पडणाºया पावसाळ्यात या ठिकाणी अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.