शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणला ग्राहकांचा ठेंगा, थकबाकी जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 15:53 IST

mahavitaran Ratnagiri-लॉकडाऊनच्या काळातील थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणने कठोर निर्णय घेतले होते. ही वसुली पूर्ण न झाल्यास महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही ऊर्जामंत्री यांनी दिले होते. मात्र, ग्राहकांनी थकीत वीजबिल भरण्याबाबत निरुत्साह दाखविल्याने रत्नागिरी जिल्ह्यात अजूनही ३४ कोटी ६६ लाख वीज थकबाकी शिल्लक राहिली आहे. या थकबाकीमुळे आता कारवाईच्या भीतीने कर्मचारी हवालदिल झाले आहेत.

ठळक मुद्दे रत्नागिरी जिल्ह्यात ३४ कोटींची थकबाकीकारवाईच्या भीतीने कर्मचारी हवालदिल

रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळातील थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणने कठोर निर्णय घेतले होते. ही वसुली पूर्ण न झाल्यास महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही ऊर्जामंत्री यांनी दिले होते. मात्र, ग्राहकांनी थकीत वीजबिल भरण्याबाबत निरुत्साह दाखविल्याने रत्नागिरी जिल्ह्यात अजूनही ३४ कोटी ६६ लाख वीज थकबाकी शिल्लक राहिली आहे. या थकबाकीमुळे आता कारवाईच्या भीतीने कर्मचारी हवालदिल झाले आहेत.मागील वर्षी २२ मार्चपासून कोरोना एके कोरोना व्यापून राहिला आहे आणि सर्वांचेच स्वत:च्या घरात राहण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. घरी राहणाऱ्या मंडळींना अगदी बाधित झालेल्या परिसरात जीवाची बाजी लावत वीज कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना अविरत वीजपुरवठा सुरू ठेवला. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यावर महावितरण कंपनीने वीज देयके देण्यास सुरुवात केली. परंतु वीज ग्राहकांच्या अडचणींचा विचार करून व एकूणच वीजवापर बराच वाढला असल्याने वीजपुरवठा खंडित न करता हप्त्याने बिल भरण्याची सवलत देण्याचा निर्णय शासनाने आणि महावितरण कंपनीने घेतला होता. सप्टेंबर २०२० पासून सगळ्या वीज ग्राहकांना हप्ते पद्धतीने वीजबिल भरणा करण्याची विनंती केली होती.परंतु, वीज ग्राहकांनी हप्त्याच्या सुविधेकडे दुर्लक्ष केल्याने थकबाकी सातत्याने वाढत राहिली होती.ऊर्जामंत्र्यांनी १० मार्च रोजी थकबाकीदारांचा पुरवठा तोडण्याचा निर्णय घेतला. यामुळे केवळ २० दिवसांत पूर्ण थकबाकी वसूल करण्याचे आव्हान महावितरण कंपनीसमोर होते. या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर काही ठिकाणी हल्लेही करण्यात आले होते. यामुळे थकबाकी वसूल होईल, याची अपेक्षा होती. परंतु, ३१ मार्चअखेर वीज ग्राहकांनी महावितरणला ठेंगा दाखविल्याचे दिसत आहे.मोहीम सुरूच राहणारएकट्या रत्नागिरी जिल्ह्यातील ९५,८२८ ग्राहकांची ३४ कोटी ६६ लाख रुपये एवढी थकबाकी शिल्लक आहे. ३१ मार्च संपला तरीही ही थकबाकी वसूल झाली नसल्याने आता कोणती कारवाई होणार, या चिंतेत कर्मचारी पडले आहेत. यामुळेच पूर्ण थकबाकी वसूल होईपर्यंत आता ही मोहीम थांबविली जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.वीज तोडण्याचा निर्णयवाढत्या थकबाकीमुळे एकही हप्ता न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय १० मार्चपासून ऊर्जामंत्र्यांना घ्यावा लागला.

टॅग्स :mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरी