शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

खाडीपट्ट्यात डोंगरतोड

By admin | Updated: July 18, 2014 23:13 IST

जबाबदार कोण : मिळेल त्या किमतीत खरेदी

खाडीपट्टा : गेल्या काही वर्षांपासून खेड शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात डोंगरांची कत्तल सुरु आहे. बेकायदा चाललेल्या या उत्खननाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. पैशांच्या लालसेपोटी ठेकेदार व जमीनमालक नियम धाब्यावर बसवून हे उत्खनन करीत असल्याचे पुढे आले आहे. बेसुमार होत असलेल्या या उत्खननामुळे खाडीपट्ट्यातील खेड - पन्हाळजे मार्गावर दरडी व दगड कोसळण्याची शक्यता आहे. हा मार्ग अशा प्रकारामुळे बंद होण्याची शक्यता ग्रामीण भागातील कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. गेल्या काही वर्षांपासून बांधकाम क्षेत्र फोफावले असून, ग्रामीण भागातून शहरीकरणावर त्याचा परिणाम झाला आहे. शहर परिसरात गुंठ्याला प्रचंड भाव येत आहे. बांधकाम व्यावसायिकांनी ग्रामीण भागातील डोंगरावर असलेल्या जागा घशात घातल्या आहेत. काही ठिकाणी यावर मोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. बहुतेक डोंगरातील जागा या मालकीच्या असल्याने संबंधितांना आमिषे दाखवून डोंगरातील जमिनी काबीज करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. खेड खाडीपट्ट्यात गेल्या दोन वर्षांपासून सुसेरी, नांदगाव, मुंबके, राजवेल, कर्जी, आमशेत, कुंभाड, खोडखाड, सवणस, बहिरवली व पन्हाळजे आदी परिसरातून मोठ्या प्रमाणात डोंगरांची कत्तल सुरु आहे. त्यामुळे उद्भवणाऱ्या धोक्याकडे महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. भविष्यात दगड कोसळून झालेल्या अपघातास जबाबदार कोणाला धरावे, असा संतप्त सवाल ग्रामस्थ करीत आहेत. खाडीपट्टा भागात डोंगरतोड मोठ्या प्रमाणावर होत असल्याने महसूल यंत्रणेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी तालुक्यातील ग्रामस्थांनी केली आहे. मात्र, असे प्रकार रोखणार कोण हा प्रश्न आहे. (वार्ताहर)