शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

मुलींच्या उज्ज्वल भविष्याच्या ‘स्वप्नां’ना आईच्या कष्टाचं कोंदण

By admin | Updated: February 1, 2015 00:50 IST

एका मातेची धडपड कौतुकास्पद

मेहरुन नाकाडे, रत्नागिरी बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे स्वत:ला पदवीधर होता आले नाही, याची खंत उराशी बाळगत, अविरत कष्ट करून परिस्थितीशी सतत झगडत, तिन्ही मुलींना उच्चशिक्षित करण्यासाठी एका मातेची चालू असलेली धडपड निश्चितच कौतुकास्पद आहे. संजना गजानन पाष्टे इमारतीच्या सुरक्षारक्षकाची जबाबदारी सांभाळतात. फावल्या वेळात कोणाची धुणीभांडी करतात, तर कोणाच्या पोळ्या लाटण्याचे काम करतात. मुलींच्या शिक्षणाची जिद्द त्यांना जणू स्वस्थ बसू देत नाही, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. गेली चौदा वर्षे म्हणजे एक तप त्या इमारतीच्या सुरक्षारक्षकाची जबाबदारी सांभाळत आहेत. पगार तुटपुंजा असला, तरी सोसायटीकडून राहायला मिळालेली छोटेखानी खोली, पाणी व विजेची मोफत व्यवस्था यामुळे त्या समाधानी आहेत. शहरात राहायचे म्हटले तर घरभाडे, वीजबिल, पाणीबिलासाठी पैसे मोजावे लागतात. परंतु, सोसायटीकडून ही व्यवस्था होत असल्याने त्या छोट्याशा संसारात समाधानी आहेत. नवरा कंत्राटी नोकरी करीत असल्याने तीही मिळकत अपुरी पडते. संजना यांचा दिवस पहाटे सुरू होतो. मुलींचा व नवऱ्याचा डबा तयार करून, घरातले आवरून लगतच्या दोन इमारतींची कामे पूर्ण करतात. मुले शाळेत गेल्यावर, त्या कोणाची धुणी भांडी किंवा फरशी पुसण्याची कामे आवरून पोळ्या लाटण्यास जातात. सायंकाळी घरी आल्यावर एका बाजूला स्वयंपाक आटोपून, मुलींचा अभ्यास स्वत: घेतात. दिवसभर काम करूनसुध्दा त्यांच्या चेहऱ्यावर कामाचा ताण कधीच नसतो. मुलींनी शिकावे, उच्चशिक्षित व्हावे, अशी मनिषा उराशी बाळगून त्यांची वाटचाल सुरू आहे. सुरूवातीला इवल्याशा खोलीमध्ये राहणाऱ्या संजना यांच्या कुटंबियांना सोसायटीने स्वखर्चाने दहा बाय दहाची खोली वजा पत्र्याची शेड बांधून दिली आहे. या रूममध्ये त्यांचा संसार सुरू आहे. संजना यांची माहेरची परिस्थितीदेखील बेताची असल्याने त्यांचे शिक्षण बारावी विज्ञानपर्यंत झाले. त्यानंतर, मिळेल ते काम करत राहिल्या. मोठी मुलगी ऋतुजा नववीत, मधली सिध्दी पाचवीत तर धाकटी ऋची इयत्ता दुसरीमध्ये शिकत आहेत. मुलीही हुशार असल्याचा संजना यांना अभिमान आहे. त्या नेहमीच प्रथम श्रेणीत असतात, त्यांच्यावर मी कोणतीच इच्छा लादणार नसल्याचे, नम्रमणे सांगून त्यांनी शिक्षण पूर्ण करून स्वत:च्या पायावर उभे राहावे, इतकीच आपली इच्छा आहे. त्यासाठी मी कितीही कष्ट सोसण्यास तयार आहे. सोसायटीतील सर्व कुटूंबांचेही मला सहकार्य लाभते, किंबहुना त्यांचे मनोधैर्य मला बळ देऊन जाते. नुकत्याच त्या मोठ्या आजारातून बाहेर आल्या आहेत. मुली लहान असल्यामुळे, त्यांनाही वेळ द्यावा लागतो. त्यामुळे मुली शाळेत असेपर्यंत, कामे पूर्ण करून मुली शाळेतून घरी परत येईपर्यंत घरी परतात. मुलींना शिष्यवृत्ती, एमटीएस, स्पर्धा परीक्षांना त्या बसविण्यास प्रवृत्त करतात. त्यासाठी जादा अभ्यासवर्ग अद्याप लावलेला नाही. मधलीची शिष्यवृत्ती चार गुणांसाठी हुकली, याची खंत आहे. परंतु त्याचे दु:ख न करता, सतत अभ्यास करावा, असे त्यांना वाटते. पुढील वर्षी मोठी मुलगी दहावीला असेल. त्यामुळे आतापासून चिंता लागून राहिली आहे.