शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

गणेशोत्सवासाठी गतवर्षीपेक्षा कोकणला यंदा दोनशे जादा गाड्या

By admin | Updated: August 24, 2014 00:41 IST

रत्नागिरी विभागामध्ये येणार १४०० गाड्या

रत्नागिरी : कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असल्याने मुंबईकर बहुसंख्येने गावाकडे येतात. यावर्षी गणेशोत्सवाकरिता कोकणात १९०० जादा गाड्या येणार आहेत. गतवर्षीपेक्षा यावर्षी २०० जादा गाड्यांची वाढ झाली आहे. त्यापैकी रत्नागिरी विभागामध्ये १४०० गाड्या येणार आहेत. राज्य परिवहन महामंडळातर्फे सालाबादप्रमाणे गणेशोत्सवाकरिता मुंबईकरांना गावी आणण्यासाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा भाविकांची संख्या जास्त असेल, या अंदाजाने गाड्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. गतवर्षी मुंबई, ठाणे, पालघर येथून १७११ गाड्या कोकणात आल्या होत्या. यावर्षी १९०० जादा गाड्या प्रवाशांना घेऊन येणार आहेत. २४ आॅगस्टपासून या गाड्या येणार असून त्यासाठी महामंडळाने महामार्गावरती गस्तीपथक, चेकपोस्ट, नियंत्रण कक्ष सुविधा उभारली आहे.दि. २४, २५, २६ व २७आॅगस्टपर्यंत जादा गाड्या प्रवाशांना घेऊन येणार आहेत. दररोजच्या १५० गाड्या वगळता १४०० गाड्यांचे नियोजन रत्नागिरी विभागासाठी करण्यात आले आहे तर ५०० गाड्या रायगड व सिंधुदुर्ग येथे येणार आहेत. कोकण रेल्वेने गणेशोत्सवासाठी जादा गाड्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र गावापासून रेल्वेस्थानक दूर असल्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी एस. टी. प्रशासनाने रेल्वेस्टेशनपासून बसस्थानकापर्यंत जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.महामार्गावर नियंत्रण कक्ष व चेकपोस्ट सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कशेडी व पोलादपूर येथे चेकपोस्ट उभारण्यात येणार असून चिपळूण, शिवाजीनगर व संगमेश्वर येथे नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येणार आहे. २४ आॅगस्टपासून कर्मचाऱ्यांचे फिरते गस्तीपथक अहोरात्र महामार्गावर तैनात करण्यात येणार आहे. त्याशिवाय आगारनिहाय पालक, अधिकारीदेखील नियुक्त करण्यात आले आहेत.दि. २६ आॅगस्ट रोजी रत्नागिरीमध्ये ४०५ जादा गाड्या येणार असून २१४ ग्रुपबुकींगच्या आहेत तर १९१ आरक्षण केलेल्या आहेत. दि. २७ आॅगस्ट रोजी सर्वाधिक जादा गाड्या येणार आहेत. ११४२ जादा गाड्या असून ८७८ ग्रुप बुकींगच्या गाड्या आहेत तर २६४ आरक्षणाच्या गाड्या आहेत. दि. २८ आॅगस्ट रोजी २५० जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून १२५ ग्रुप बुकींग तर १३५ आरक्षणाच्या गाड्या येणार आहेत.महामार्गावरती चालकांना मार्ग दाखविण्यासाठी कर्मचारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मार्गावरील तीन ठिकाणी हे कर्मचारी पथक चालकांना दिशादर्शक ठरणार आहेत. गणेशोत्सवासाठी पुणे, कोल्हापूर येथून जादा गाड्या चालकांसहित मागविण्यात येत असल्यामुळे त्यांना कोकणातील मार्गांची दिशादर्शक करण्यात येते. महामंडळातर्फे मुंबईकरांना सुरक्षित गावापर्यंत आणण्यासाठी नियोजन करण्यात आले असून फिरत्या पथकाद्वारे योग्य खबरदारी घेण्यात येणार असल्याचे विभागनियंत्रक के. व्ही. देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)