शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ST Strike: ओबीसी संघर्ष समितीचा मोर्चा, अन् पाेलिसांनी दाखल केला चक्क दिवंगत शामराव पेजे यांच्यावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 12:28 IST

या प्रकारामुळे रत्नागिरी तालुका ओबीसी संघर्ष समिती आक्रमक

रत्नागिरी : एसटी बस सेवा सुरु करण्याच्या मागणीसाठी ओबीसी संघर्ष समितीने काढलेल्या मोर्चानंतर रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात ९९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, त्यात ९० क्रमाकांवर चक्क लोकनेते, माजी खासदार स्व. शामराव पेजे यांच्या नावाचा समावेश झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.याबाबत संघर्ष समितीने प्रसिद्धी पत्रकातून आघाडी सरकारचा जाहीर निषेध करत प्रशासन प्रमुखांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दिवंगत लोकनेते शामराव पेजे हे कुणबी समाजासह संपूर्ण रत्नागिरीवासीयांचे एक आदर्श नेते होते. आजही त्यांचे नाव आदराने घेतले जाते.गुरुवार, दि. १० फेब्रुवारी २०२२ रोजी रत्नागिरी तालुका ओबीसी संघर्ष समितीने एसटी सुरु करण्यासाठी माेर्चा काढला हाेता. पोलिसांनी या मोर्चेकऱ्यांवर गुन्हे दाखल केले होते. एफआयआरमध्ये तब्बल ९९ जणांची नवे पोलिसांनी नमूद केली असून त्यांच्यावर भादंविक १४१, १४३, १४९, २६९ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चा ११० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या ९९ संशयितांमध्ये समितीचे अध्यक्ष नंदकुमार मोहिते, उपाध्यक्ष राजीव किर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्यामध्येच लोकनेते शामराव पेजे यांचेही नाव समाविष्ट केल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शास आले. या प्रकारामुळे रत्नागिरी तालुका ओबीसी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे.याबाबतचे लेखी म्हणणे समितीच्यावतीने मांडण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी एसटी पुन्हा सुरु करा या विधायक कामासाठी समिती एकत्र आली. पोलिसांनी अनेकांवर गुन्हे दाखल करून आमचा न्याय मागण्याचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न तर केलाच परंतु, आम्ही ज्यांना दैवत मानले आहे. त्या आमच्या दिवंगत नेत्यांचाही अपमान केला आहे, असे समितीचे म्हणणे आहे.कुणबी आणि ओबीसी समाजाचे दैवत लोकनेते स्व. शामराव पेजे यांच्यावर ९० नंबर चे आरोपी म्हणून गुन्हा दाखल केला आहे. ही अक्षम्य गंभीर चूक करणाऱ्या जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नंदकुमार मोहिते, साक्षी रावणांग, राजीव यशवंत कीर,  दीपक राऊत यांनी केली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीST Strikeएसटी संप