राजापूर : तालुक्यातील मुंबई - गोवा महामार्गावरील मोबाईल शॉपी फोडून चोरट्याने ६९ हजार ९०० रुपये किमतीच्या मोबाईल हॅन्डसेटची चोरी केल्याची तक्रार दिव्या दिलीप कुलपे (२८) यांनी राजापूर पाेलीस स्थानकात दिली आहे. शनिवार, दि. २९ मे रोजी सायंकाळी ६ ते ३० मे सकाळी ८ वाजण्याच्या कालावधीत ही घटना घडली.
फिर्यादी दिव्या कुलपे यांच्या मालकीचे ओणी कोंडिवळे येथे गणेश मोबाईल ॲण्ड इलेक्ट्रिकल्स दुकान आहे. शनिवारी सायंकाळी ६ वाजता दुकान बंद करून घरी गेल्या. सकाळी ८ वाजता त्यांचे दीर अशोक कुलपे हे दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाचे कुलूप व शटर तोडलेले दिसले. त्यांनी याबाबत दिव्या कुलपे यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. त्यांनी येऊन पाहिले असता रेडमी नोट, रियल मी कंपनीचे सुमारे ६९ हजार ९०० रुपये किमतीचे मोबाईल चाेरट्यांनी लांबविल्याचे पाहिले. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर मौळे करीत आहेत.